Header Ads Widget

महाराष्ट्र राज्याचे तिसरे मुख्यमंत्री वसंतराव नाईक

महाराष्ट्र राज्याचे तिसरे मुख्यमंत्री
 वसंतराव नाईक 
CM.VASANTRAO NAIK 



वसंतराव फुलसिंग नाईक हे कृषीतज्ञ, प्रगतशील शेतकरी व राजनितीज्ञ होते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी सर्वाधिक काळ होते. नाईकांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद या गावाजवळील गहुली या छोट्या खेड्यातील एका सधन शेतकरी कुटुंबात झाला होता. हे पुसद नगरपालिकेचे अध्यक्षपद होते. नाईक हे महाराष्ट्रातील हरित क्रांती, पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक समजले जातात.
[१] माजी राष्ट्रपती, भारतरत्न प्रणव मुखर्जी यांनी "वसंतराव नाईक हे भारत मातेचे थोर सुपूत्र आहेत." या शब्दात नाईकांचा गौरव केला. इ.स. १९७२ मधील महाराष्ट्रातील भीषण दुष्काळादरम्यान त्यांनी शेतकऱ्यांना मदतीच्या योजना राबवल्या. नाईक यांना 'शेतकऱ्यांचा जाणता राजा', 'हरितयोद्धा' म्हणूनही संबोधतात.साहित्यिक, विचारवंत एकनाथ पवार यांनी 'आधुनिक कृषीप्रधान भारताचे कृषीसंत' या शब्दात वसंतराव नाईक यांचे वर्णन केले आहे.


वसंतराव नाईक यांच्यावरील चित्रपट

     'महानायक वसंत तू' हा मराठी चित्रपट वसंतराव नाईक यांच्यावर आधारित असून यामध्ये अभिनेता चिन्मय मांडलेकर यांनी वसंतराव नाईक यांची भूमिका साकारली आहे. भारत गणेशपुरे व अभिनेत्री निशा परूळेकर यांनी देखील भूमिका साकारली आहे. तसेच दिग्दर्शक प्रा. जब्बार पटेल यांनी सुद्धा वसंतराव नाईक यांच्यावर डॉक्यूमेंटरी फिल्म बनवली. याशिवाय वसंतराव नाईक यांच्या जीवनावर आधारित विविध भाषेत गाणी, पोवाडे, कविता ,पथनाट्य देखील रचले आहे.

भूषविलेली पदे 
इ.स.१९४६ - पुसद नगरपालिकेचे अध्यक्षपद.
इ.स. १९५२ - पहिल्या सार्वत्रिक निवडणूकीत काँग्रेस पक्षातर्फे मध्यप्रदेश आणि विदर्भाच्या विधिमंडळावर आमदार.
इ.स. १९५६ - महाराष्ट्राचे सहकारमंत्री.
इ.स. १९५७ - महाराष्ट्राचे कृषीमंत्री.
इ.स.१९५८ - आंतरराष्ट्रीय राईस कमिशनच्या भारतीय शिष्टमंडळात निवड.
इ.स. १९६० - लोकशाही विकेंद्रीकरण समितीचे अध्यक्ष.
इ.स. १९६२ - महाराष्ट्राचे महसूलमंत्री.
इ.स. १९६३ - ५ डिसेंबरला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री.
इ.स. १९७२ - तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री.
इ.स. १९७७ - वाशीम लोकसभा मतदारसंघाचे खासदार.
मागील:
मारोतराव कन्नमवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
डिसेंबर ५, इ.स. १९६३ – फेब्रुवारी २०, इ.स. १९७५ पुढील:
शंकरराव चव्हाण

मृत्यू:

वसंतराव नाईक यांचे निधन १८ ऑगस्ट १९७९ रोजी सिंगापूर येथे झाले. पुढे त्यांचे पुतणे सुधाकरराव नाईक हे सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. १९७० च्या दशकात मुंबईतील कम्युनिस्ट-नेतृत्वात कामगार संघटनांचे प्रतिउत्तर म्हणून शिवसेना उभी करण्याच्या नाईकांच्या धोरणाला अनेक पत्रकार आणि राजकीय अभ्यासाचे तज्ज्ञ, उजवे विचार पक्ष असलेल्या शिवसेनेच्या उदयाचे श्रेय देतात.

Post a Comment

0 Comments

राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत मासिक अंशदानाच्या रकमा PRAN खाती जमा करण्याबाबत सुधारीत कार्यपध्दती दि.30/12/2024 चा शासन निर्णय*