Header Ads Widget

आदिवासी कृतज्ञ समाज बहुउद्देशिय संस्थेमार्फत तलासरी तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

आदिवासी कृतज्ञ समाज बहुउद्देशिय संस्थेमार्फत तलासरी तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

तलासरी / पालघर, दि. 20
आदिवासी कृतज्ञ समाज बहुउद्देशिय संस्था, तलासरी या संस्थेमार्फत शैक्षणिक वर्ष २०२१ - २२ मधील तालुक्यातील कला, वाणिज्य व विज्ञान या विभागातून गुणवंत कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा कॉ. गोदावरी परुळेकर महाविद्यालयाच्या सभागृहात अतिशय उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमास यशस्वी उद्योजक मुकेश भोये व साऊथ गुजरात आयडॉल स्पर्धा विजेती वृषाली धोडी हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय कोम यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले.

तालुक्यातील सर्व स्तरांतील विद्यार्थ्यांना न्याय देता यावा, याकरिता संस्थेने माध्यमिक शाळांची जि. प. शाळा, शासकीय आश्रमशाळा, अनुदानित व खाजगी शाळा या तीन गटात विभागणी करून प्रथम ते तृतीय क्रमांक काढण्यात आले. तर उच्च माध्यमिक मध्ये तालुक्यातून गुणानुक्रमे एकत्रित प्रथम ते तृतीय क्रमांक काढण्यात आले. यात माध्यमिकच्या ९ व उच्च माध्यमिकच्या १० असे एकूण १९ गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. प्रथम क्रमांक - १ हजार रुपये रोख, सन्मानपत्र व गुलाबपुष्प, द्वितीय क्रमांक -  ७०० रुपये रोख, सन्मानपत्र व गुलाबपुष्प, तृतीय क्रमांक - ५०० रुपये रोख सन्मानपत्र व गुलाबपुष्प असे बक्षिसाचे स्वरूप असून एकूण १४ हजार २०० रुपये ह्या बक्षिसाच्या  रक्कमेचा भार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मुकेश भोये यांनी उचलला.
संस्थेचे सल्लागार वसंत भसरा व संचालक दामू बरफ यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. उपस्थितांसाठी उद्योजक राजेशभाई धोडी व टीम यांच्याकडून चहा व्यवस्था करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे उपाध्यक्ष राजेश वाघात यांनी केले. संचालिका शैला वरठा यांनी कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सहकार्य करणाऱ्या व उपस्थित सर्वांचेच आभार मानून आभारप्रदर्शन केले. संचालक रान उराडे व सुरेश परेड यांनी धरती गीत गाऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment

0 Comments

व्हिडीओ निर्मिती स्पर्धा 2023 निकाल लिंक

LEARN EXCEL PAGE SETUP - 1