Header Ads Widget

शिक्षक आंतरजिल्हा बदली मधील अनियमितता दुर करुनच आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबवा

शिक्षक आंतरजिल्हा बदली मधील अनियमितता दुर करुनच आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबवा.

दुर्गम क्षेत्र शिक्षक महासंघाचे शासनाला निवेदन

         शिक्षक बदली पोर्टल द्वारे होत असलेल्या आंतर जिल्हा बदलीतील अनियमिततेबाबत दुर्गम क्षेत्र शिक्षक महासंघाने ग्रामविकास विभाग अतिरिक्त मुख्य सचिव व गिरीष महाजन ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र शासन यांना  निवेदन देउन या बदली प्रक्रिये दरम्यान होत असलेल्या अनियमितता दूर करून ग्रामविकास विभागामार्फत शिक्षक बदली संदर्भात नवीन धोरण आखून त्यानुसार पारदर्शक बदली प्रक्रिया राबवण्याची विनंती केली आहे. बदली पारदर्शक बनवण्यासाठी  घेत असलेल्या मेहनतीबाबत दुर्गम क्षेत्र शिक्षक महासंघाने ग्रामविकास विभागाचे आभार मानून हाच न्याय आंतरजिल्हा बदली बाबत पोर्तल वर जागा भरणाऱ्या प्रशासनाला देखील लावण्याची विनंती केली आहे.  शिक्षकांच्या अर्जाची पडताळणी करून चूकीची माहिती असणारे अर्ज बदली प्रक्रियेतून बाद करून ज्याप्रकारे शिक्षकांच्या माहीती ची कसून चौकशी केली अगदी त्याचप्रमाणे प्रशासनाने आंतर जिल्हा बदली पोर्टल वर भरलेली माहिती व आंतरजिल्हा बदली संदर्भात पोर्टलवर दाखवण्यात येणाऱ्या जागा या देखील वस्तुनिष्ठ व पारदर्शक असणे गरजेचे असून या चुकीच्या जागा हेतू परस्परपणे व आर्थिक गैरव्यवहार करून चुकीच्या दाखवल्या बाबत शिक्षकांच्या मनात मोठ्या प्रमाणात संभ्रम असल्याने याबाबत पारदर्शकता आवश्यक आहे. पोर्टलवर जागा दाखवत असताना त्या वस्तुनिष्ठ व नियमाला धरून नसल्याचे दिसत असून त्याची ही दखल घेऊन आपण याची योग्य यंत्रणेमार्फ रिजेक्ट करून  योग्य त्या जागां पोर्टल वर नव्याने भरूनच बदली प्रक्रिया राबवणे आवश्यक आहे. तेव्हाच ब विशिष्ट प्रवर्गावर अन्याय न करता पारदर्शक पद्धतीने पूर्ण पोर्टलवर दाखवण्यात येणाऱ्या जागा संदर्भात दुर्गम क्षेत्र शिक्षण महासंघा मार्फत पुढीप्रमाणे त्रुटींवर काही महत्वाचे आक्षेप घेनन्यात आलेले आहेत.
        ऑनलाईन पोर्टल वर रोष्टर नुसार बीड  जिप ने चुकीच्या जागा दाखवणे, खुला प्रवर्गची 322 पदे रिक्त असताना देखील पोर्टल वर केवळ 21 च रिक्त जागा दाखवणे, एकुण रिक्त पदे 598 असून देखील पोर्टल वर एकुण वजा (-411) पदे दाखवणे, रोष्टर मध्ये वस्तीशाळा शिक्षकांना चुकीच्या बिंदूवर स्थान देणे, बिंदूनामावली मध्ये फेरफार करून खुला प्रवर्गात टाकलेल्या 306 लोकांवर कार्यवाही करणे, उच्च न्यायालयीन निर्णय व 27/11/15 च्या शासन निर्णयावर कार्यवाही न करणे बाबत तक्रार करून 52/17 याचिके वर तात्काळ कार्यवाही करुनच बदली प्रकिया पूर्ण करणे बाबत शासनास विनंती करण्यात आली आहे. तसेच पोर्टल वर शून्य जागा दाखवणाऱ्या जीप च्या रोष्टर ची चौकशी करावी नांदेड, लातूर सारख्या काही जीप नी जागा रिक्त असताना देखील पोर्टलवर शून्य जागा दाखवून 15 ते 20 वर्षा पासून आंतर जिल्हा बदली प्रतीक्षेतील लोकांना बदली प्रक्रियेपासून गैर मार्गाने दूर ठेवण्याचा डाव असुन लातूर जीप मध्ये तर कित्येक वर्षानंतर खुला प्रावर्गाच्या जागा रिक्त झालेल्या असताना देखील पोर्टल वर शून्य जागा दाखवून खुला प्रवर्गासह ईतर प्रवार्गावर देखील अन्याय करण्यात आलेला आहे. तसेच लातूर जीप पोर्टल वर शून्य जागा दाखवून खाजगी शाळातील शिक्षकांना समायोजनासाठी या जागा वापरण्याच्या तयारीत असल्याचे चालू हालचालींवरुन दिसते. या बाबींची चौकशी करून नियमानुसार योग्य जागा दाखववाव्यात. अहमदनगर प्रमाणे काही जीप नी ईतर प्रवर्गात अतिरिक्त ठरणाऱ्या लोकांसाठी खुला प्रवर्गात रिक्त असणाऱ्या जागा कमी करून पोर्टलवर दाखवण्यात आलेल्या आहेत. माञ कोणत्याच जीप ने खुला प्रवर्गात अतिरिक्त असल्याचा भार ईतर प्रवर्गावर टाकलेला नाही. म्हणजे हे नैसर्गिक न्यायाच्या विपरीत असल्याने तात्काळ याबाबात निर्देश देऊन खुला प्रवर्गाच्या जागा खुला प्रवर्गासाठी दाखवाव्यात. 5 मार्च 2015 व 26 जून 2015 च्या शासन निर्णयाप्रमाणे पेसा क्षेत्रातील स्थानिक उमेदवारांसाठी राखीव असणाऱ्या जागा भरण्यासाठी अनुसूचित क्षेत्रात रिक्त होणारी पदे परंतु जिल्ह्यातील रिक्त पदांच्या 20% च्या मर्यादेत ही पदे स्थानिक अनुसूचित क्षेत्रातून भरण्या बाबतची तरतूद असताना देखील पालघर सारख्या काही जीप नी माञ जिल्ह्यातील रिक्त पदांच्या कैक पटीने (पालघर 200% च्या आसपास पर्यंत) पदे पेसा स्थानिक लोकांसाठी रिक्त दाखवलेली असुन हे नियमबाह्य असल्याने तात्काळ या बाबींवर योग्य ती खबरदारी घेउन कार्यवाही करणेची विनंति केलेली आहे.
    याप्रमाणे व रोष्टर मधील मोठया प्रमाणावर होणाऱ्या घोटाळ्यांमुळे खुला प्रवर्गसह ईतर काही प्रावर्गावर आंतर जिल्हा बदली च्या 1 ते 4 टप्प्यांमध्ये मोठया प्रमाणावर अन्याय झालेला असुन चालू टप्पा तरी या लोकांना न्याय देण्यासाठी पोर्टल वर योग्य त्या जागा दाखवूनच आंतरजिल्हा बदली प्रक्रिया पूर्ण करण्याची विनंती दुर्गम क्षेत्र शिक्षण महासंघाकडून करण्यात आलेली आहे या निवेदनावर संस्थापक जयंत आमटे, राज्याध्यक्ष अमोल जाधव व राज्यसचिव तुकाराम आलट यांच्या सह्या आहेत.

प्रतिक्रिया

"पारदर्शक बदली प्रक्रियेसाठी शिक्षकांनी बदली पोर्टल वर भरलेली माहिती तपासणे स्वागतार्ह आहे माञ त्याच प्रमाणे हेतूपरस्परपने पोर्टल वर चूकीची माहिती भरणाऱ्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाई होण्याची गरज आहे."

                जयंत आमटे
                   संस्थापक
दुर्गम क्षेत्र शिक्षक महासंघ महाराष्ट्र राज्य

Post a Comment

0 Comments

व्हिडीओ निर्मिती स्पर्धा 2023 निकाल लिंक

LEARN EXCEL PAGE SETUP - 1