HEADER

HSRP नंबर प्लेट बसविण्यासाठी मुदतवाढ

 दि.०१/०४/२०१९ पुर्वीच्या जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट (HSRP) बसविण्याबाबत









परिपत्रक क्र.५२/२०२५



विषय :- दि.०१/०४/२०१९ पुर्वीच्या जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट (HSRP) बसविण्याबाबत.


संदर्भ :- १ या कार्यालयाचे परिपत्रक क्र.६८/२०२४/पआका/का.११/२०२४/ जा.क्र १४८७९. दि. २३.१२.२०२४.


२ या कार्यालयाचे परिपत्रक क्र १८/२०२५/पआका/का-११/HSRP/२०२५/जाक्र ३५२५ दिनांक २०.०३.२०२५


दि.०१.०४.२०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) दि.३१/०३/२०२५ पर्यंत बसविण्याचे निर्देश देण्यात आले होते. जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसविण्यासाठी संदर्भीय परिपत्रक क्रमांक २ अन्वये ३०.०६.२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. तथापि, अनेक जुन्या वाहनांवर HSRP बसविणे बाकी असल्याने HSRP बसविण्यासाठीची मुदत वाढवून देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. सबब, या परिपत्रकाद्वारे दि. ०१/०४/२०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना HSRP बसविण्यासाठी दिनांक १५.०८.२०२५ पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात येत आहे. त्यानंतर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसविणा-या वाहनांवर वायुवेग पथकाद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तथापि, दिनांक १५.०८.२०२५ पर्यंत HSRP बसविण्यासाठी पुढील अपॉइंटमेंट घेतलेल्या वाहन मालकांवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही..





तरी सर्व सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रात याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी, तसेच स्थानिक वाहन वितरक, ऑटोरिक्षा / टॅक्सी/बस / ट्रक संघटनांची बैठक घेऊन याबाबत सर्वांना अवगत करावे.
















Post a Comment

0 Comments

Maharashtra TET 2025 Exam | अर्ज तारीख, वेळापत्रक व संपूर्ण माहिती