मंथन राज्यस्तरीय प्रज्ञाशोध/सामान्य ज्ञान परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार.
विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी. स्कॉलरशिप व नवोदय परीक्षेचा पाया भक्कम करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांमधील प्रज्ञावंत विद्यार्थी शोधण्यासाठी या परीक्षेचे आयोजन दिनांक 10 एप्रिल 2022 रोजी करण्यात आले होते.
सदर परीक्षेच्या अभ्यासासाठी 2 महिन्यांचाच कालावधी तसेच कोरोनाचे संकट असूनही बऱ्याच विद्यार्थ्यांनी अतिशय उत्तम अशी कामगिरी केली.
आज दिनांक 21ऑगस्ट 2022 रोजी जि. प. शाळा आशागड येथे मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करुन त्यांना प्रशस्तीपत्र व गौरव चिन्ह प्रदान करण्यात आले. हा सत्कार सोहळा मा. श्रीम. शकुंतला शिंदे (रिसर्च ऑफिसर वर्ग 2 पालघर), मा. श्री अंकुश सांगळे (पोलीस उप निरीक्षक मनोर), मा. श्री अशोक तळेकर (तंत्रस्नेही आदर्श शिक्षक) तसेच मा.डॉ. श्री हरीश रदाळ यांच्या हस्ते संपन्न झाला. वरील मान्यवरांनी स्पर्धा परीक्षेचे महत्त्व व स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी याबाबत मार्गदर्शन केले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना पुढील परीक्षेसाठी प्रेरणा व शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांनी, पालकांनी व शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. यामधे श्री भागवत रोकडे (शिक्षक जिल्हा परिषद शाळा) यांनी सांगितले की मंथन च्या पुस्तकातील अभ्यास केल्यामुळे त्यांच्या शाळेतील तीन विद्यार्थी नवोदय परीक्षेत पात्र ठरले. या यशाबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच जिल्हा परिषद शाळेतील मुलांना प्रथमच परीक्षेत सहभागी केल्याबद्दल श्री वाकळे सर, श्रीम. नलिनी दिवटे-घालमे मॅडम व सौ शिल्पा वनमाळी मॅडम यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन व आयोजन श्री ज्ञानदेव सुंबे, श्री विक्रम दळवी व श्री धर्मराज पाटील यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम. रोहिणी कट्टीमनी-कांबळे यांनी केले. श्री घालमे सर, श्री बागल सर, श्री घोगरे सर, श्री माणिक जाधव सर व श्री सुपेकर सर यांनी विशेष सहकार्य केले. सदर कार्यक्रमास सर्व पालक, विद्यार्थी, शिक्षक व इतर मान्यवर उपस्थित होते.
गुणवंत विद्यार्थी यादी खालीलप्रमाणे
आशागड केंद्र
1) अनुराज सुपेकर 1ली प्रथम क्रमांक
2) देवेन्द्र संदीप मदगे 1 ली द्वितीय क्रमांक
3) कौस्तुभ नितीन तिडोळे 2 री प्रथम क्रमांक
4) वेदांत दत्तात्रय लोकरे 2 री द्वितीय क्रमांक
5) तृप्ती ज्ञानदेव काकडे 2 री द्वितीय क्रमांक
6) क्षितिज सुरेश कांबळे 3 री प्रथम क्रमांक
7) विक्रांत महेशराव शेकडे 4 थी प्रथम क्रमांक
8) रत्नप्रभा भागवत गादेवार 5 प्रथम क्रमांक
9) प्रणव मुकेश चौधरी 6 वी प्रथम क्रमांक
10) तनय बळवंत वनमाळी 7 वी प्रथम क्रमांक
मनोर केंद्र
1) शर्वरी अजित बर्डे 1 ली
2) अथर्व धर्मराज पाटील 2 री प्रथम
3) श्रेयस बापू चव्हाण 3 री प्रथम
4) श्रीराजवीर विक्रम दळवी 4 थी प्रथम
5) जान्हवी हरीश रडाळ 7 वी प्रथम
अतिउत्कृष्ट आणि उत्कृष्ट कामगिरी करणारे विद्यार्थी :-
अतिउत्कृष्ट (Outstanding 'A+')
1) अभिमन्यू नारायण बामणे 1ली
2) ओवी बाळू गोटे 1 ली
उत्कृष्ट (Excellent 'A')
1) उर्वी विष्णू ठोंबरे 1 ली
2) देवर्ष राहुल साखरे 1 ली
3) आरोही बापू ढोबळे 2 री
4) स्वराज व्यंकट लोकरे 4 थी
5) स्वरा लक्ष्मण मुळे 4 थी
6) मोनल माधव आबंदे 5 वी
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS