Header Ads Widget

नागपाडा पोलीस ठाणे येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने नशामुक्ती अभियान संपन्न

नागपाडा पोलीस ठाणे येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने नशामुक्ती अभियान संपन्न*

दि. २२ ऑगस्ट २०२२ रोजी नागपाडा पोलीस ठाणे व  नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांचे संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने नशामुक्ती अभियान अकबर पीरभाई महाविद्यालय नागपाडा मुंबई येथे राबविण्यात आले. या कार्यक्रमास नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य चे मुख्य संघटक अमोल मडामे हे प्रमुख पाहुणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. नागपाडा पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक  मा. रमेश खाडे   यांच्या मार्गदर्शनावरून कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
 व्यसनांमुळे माणसास शारिरीक, मानसिक व सामाजिक दुष्परिणामांना तोंड द्यावे लागते ( दारू, गुटखा, तंबाखू, सिगारेट, अमली पदार्थ ) चे सेवन व त्यांचे दुष्परिणाम या विषयावर मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येते. यावेळी कार्यक्रमात नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य चे उपनगर जिल्हा संघटक दिशा कळंबे,  नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य चे कार्यक्रम समन्वयक श्री. मिलिंद रूपचंद पाटील, पोलीस स्टेशन चे उपनिरीक्षक पटेल मॅडम, माळी मॅडम, कुंभार मॅडम, अकबर पीरभाई महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक, महाविद्यालय विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी व्यसनमुक्तीची शपथ घेऊन कार्यक्रमाचा समारोप झाला अशी माहिती नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य चे पालघर जिल्हा संघटक श्री मिलिंद रूपचंद पाटील यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments

व्हिडीओ निर्मिती स्पर्धा 2023 निकाल लिंक

LEARN EXCEL PAGE SETUP - 1