जि.प.शाळा सारसुन येथे सुरक्षेबाबत जणजागृती
जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळा सारसुन येथे जव्हार पोलीस स्टेशन जव्हार च्या पोलीस उपनिरीक्षक सुर्यवंशी मॅडम यांनी इ.१ ली ते १० वर्गातील सर्व मुलांना शाळेत येताना जाताना आपणास कोणी त्रास देत असेल किंवा पाठलाग करत असेल किंवा आमिष दाखवत असेल तर आपण पोलीस यंत्रणेशी संपर्क करा . तसेच लहान मुलांना तुम्हाला कोणी अपरिचित व्यक्ती काही आमिष दाखवत असेल किंवा तसे करण्याचा प्रयत्न करत असेल कर त्याला बळी न पडता आपल्या शिक्षकांना सांगा किंवा मला सांगा असे सांगितले व स्वतः चा संपर्क क्रमांक मुलांना दिला . तसेच सुरक्षेसंबधी कोणतीही तक्रार असेल तर नक्की संपर्क करा घाबरु नका असे सांगितले .
खिरारी मेजर यांनी मुलांना सुरक्षेसंबधी सुचना दिल्या . जिल्हा परिषद शाळा सारसुन तर्फे पोलीस उपनिरीक्षक सुर्यवंशी मॅडम यांचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक रामचंद्र भरसट यांनी केले . सदरील जनजागृतीस शाळेतील अनिल भरसट , राथड सर , दिपक चौधरी , कोरे सर,रोहित जाधव,प्रिती घेगड , केशव चौधरी शिक्षक उपस्थित होते . रोहित जाधव यांनी पोलीस यंत्रणेचे आभार मानले व असेच नेहमी मार्गदर्शन लाभावे अशी विनंती केली
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS