HEADER

व्यसन हा मानसिक आजार आहे :- मिलिंद पाटील

*व्यसन हा मानसिक आजार आहे :- मिलिंद पाटील*

  दिनांक १३ सप्टेंबर २०२२ रोजी  नशाबंदी मंडळ कार्यालयात मैत्री संस्था सामाजिक कार्यकर्ता प्रशिक्षण अंतर्गत संस्था भेट कार्यक्रमात मुंबई विभागातील सक्रिय अनुभवी ३० कार्यकत्यांनी भेट दिली यावेळी नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य चे पालघर जिल्हा संघटक श्री मिलिंद रूपचंद पाटील यांनी नशाबंदी मंडळाची ओळख कामकाज माहिती दिली. यावेळी मिलिंद पाटील यांनी सामाजिक कार्यकर्ता प्रशिक्षणात सहभागी झालेल्या प्रशिक्षणार्थींना मागदर्शन करण्यात आले यावेळी त्यांनी  व्यसन हा मानसिक आजार आहे आणि तो बरा होऊ शकतो. नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य गेल्या ६४ वर्ष महाराष्ट्रात व्यसनाविरोधी प्रचार, प्रचार, प्रबोधन करीत आहे. मंडळाचे मुख्य ध्येय मतपरिवर्तनातून व्यसनमुक्ती समाज निर्माण करणे. आपण ज्यावेळी एक किंवा अनेक व्यसनाच्या आहारी जातो तेव्हा एकापेक्षा अनेक संकटांना सामोरे जात असतो. व्यसनामुळे माणसास शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणामांना तोंड द्यावे लागते.
दारू, तंबाखू , गुटखा, सिगारेट या मादक द्रव्यांचे व्यसन समाजामध्ये फोफावत आहे. यामुळे कर्करोग, फुफुसाचे व तोंडाचे आजार, असह्य खोकला, बुद्धी भ्रष्ट होऊन मेंदूचे कार्य मंदावणे, हार्ट अटॅकची शक्यता वाढणे, रक्ताशय होणे, शरीर मन कमकुवत होणे हे आजार शरीराला एकूणच पोखरून माणसाला मृत्यूच्या दारात कधी नेऊन ठेवतो हे कळत सुद्धा नाही असेही सांगितले.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार नुसार २०२० ते २०३० पर्यंत जगातील सुमारे १०० कोटी लोक तंबाखूच्या रोगामुळे मृत्यू पावतील.  त्यामध्ये २० ते ३० वयोगटातील ४०% लोक असू शकतील असे वर्तविले असल्याचेही सांगितले.
व्यसनाच्या प्रकार व प्रमाणावर रुग्णाचे उपचार अवलंबून असतात. आपण उपचार घेऊन निर्व्यसनी व्हावे व ईतरांना निर्व्यसनी करण्याकरिता नशाबंदी मंडळाच्या संकल्पात सामील व्हा असे आव्हानही यावेळी मिलिंद पाटील यांनी केले. 

यावेळी प्रशिक्षणार्थींनी व्यसनमुक्तीच्या या कार्यात आम्ही जोडून घेऊ आणि स्वतः निर्व्यसनी राहू असा संकल्प सर्वांनी केला. या संस्था भेट कार्यक्रमात सुत्रसंचलन मैत्री संस्था चे संस्थापक अध्यक्ष सुरज भोईर तर आभार प्रदर्शन मैत्री संस्था चे सचिव राजेश जाधव यांनी केले.

Post a Comment

0 Comments

शिष्यवृत्ती परीक्षा 2026 | केंद्रसंचालक, पर्यवेक्षक नियम व Custody माहिती