खंडेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल ने राष्ट्रीय विज्ञान नाट्य उत्सव 2022-23 आयोजित तालुकास्तरीय स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक
परंडा गटशिक्षण कार्यालय येथे तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सव निमित्त तालुकास्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी प्रथमतः मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. या स्पर्धेमध्ये तालुक्यातील अनेक शाळा सहभागी झाल्या होत्या. यात सर्व शाळांनी आपापले विज्ञानावर आधारित नाटक सादर केले. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून गुरुवर्य रा.गे. शिंदे महाविद्यालय येथील प्राध्यापक अंकुश एस.बी. प्राध्यापक जाधव व्ही.एन. प्राध्यापक चव्हाण एस. एस. प्राध्यापक धनवे एस.पी. तसेच सूर्यभान हाके (शिक्षण विस्तार अधिकारी गटशिक्षण कार्यालय परंडा) काळे बी. एम. (अध्यक्ष/ परांडा तालुका विज्ञान अध्यापक मंडळ) हे लाभले होते. त्यावेळी खंडेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल मधील विद्यार्थी कृष्णा चावरे, प्रतीक्षा देवळकर, श्रेया सातपुते, फिजा पठाण, आवेज मुजावर, दीक्षा शिंदे, मोनिका गुडे, अपूर्वा लिमकर या विद्यार्थ्यांनी लसीकरणाची कथा हे नाटक सादर करून परीक्षकांची व उपस्थितांची मने जिंकली. या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला व तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी म्हणून परीक्षकांनी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड केली. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक नवनाथ बाप्पा खैरे व शाळेचे मुख्याध्यापक संजय जाधव यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षक डिसले प्रियंका, अंकुश पोळ व त्यांच्या कार्याचे मनःपूर्वक कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS