सुप्पारक बुध्द विहारात बौद्ध धम्मानेच भारत अंधश्रद्धा व नशामुक्त होणार या विषयावर कार्यशाळा संपन्न
दिनांक १० सप्टेंबर २०२२ रोजी बौद्ध सभा चेंबुर ( वर्षावास २०२२ ) यांच्या सौजन्याने सुप्पारक बुध्द विहार व नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने *बौद्ध धम्मानेच भारत अंधश्रद्धा व नशामुक्त होणार या विषयावर कार्यशाळा* सुप्पारक बुध्द विहार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, पी. एल. लोखंडे मार्ग, चेंबुर मुंबई येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य चे ठाणे जिल्हा संघटक श्री सुनिल चव्हाण, मुंबई शहर जिल्हा संघटक रविंद्र गमरे, पालघर जिल्हा संघटक श्री मिलिंद रूपचंद पाटील, स्वयंसेवक ज्योती चव्हाण, सुप्पारक बुध्द विहारातील आनंद म्हसके, माने साहेब, बबन कांबळे, अध्यक्ष, सदस्य, चेंबुर मधील रहिवासी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या कार्यशाळेची समारोप व्यसनमुक्ती ची शपथ देऊन करण्यात आली अशी माहिती नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य चे पालघर जिल्हा संघटक श्री मिलिंद रूपचंद पाटील यांनी सांगितले.
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS