*मध्य प्रभादेवी सार्वजनिक उत्सव मंडळात व्यसनमुक्ती या विषयावर मार्गदर्शन संपन्न*
दि. ६ सप्टेंबर २०२२ रोजी मध्य प्रभादेवी सार्वजनिक उत्सव मंडळ व नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांचे संयुक्त विद्यमाने व्यसनमुक्ती या विषयावर मार्गदर्शन मध्य प्रभादेवी सार्वजनिक उत्सव मंडळ, प्रभादेवी नाका, मुंबई येथे आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमास नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य चे संघटक सुनिल चव्हाण हे प्रमुख पाहुणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. मध्य प्रभादेवी सार्वजनिक उत्सव मंडळाचे अध्यक्ष सुभाष सारंग यांच्या मार्गदर्शनावरून कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
व्यसनांमुळे माणसास शारिरीक, मानसिक व सामाजिक दुष्परिणामांना तोंड द्यावे लागते ( दारू, गुटखा, तंबाखू, सिगारेट, अमली पदार्थ ) चे सेवन व त्यांचे दुष्परिणाम या विषयावर मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येते. यावेळी कार्यक्रमात नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य चे स्वयंसेवक ज्योती चव्हाण यांनी व्यसनमुक्ती वर गीत सादर केले तर मुंबई शहर जिल्हा संघटक रविंद्र गमरे, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य चे कार्यक्रम समन्वयक श्री. मिलिंद रूपचंद पाटील, मध्य प्रभादेवी सार्वजनिक उत्सव मंडळाचे अध्यक्ष, सचिव, सदस्य, मंडळाचे कार्यकर्ते, प्रभादेवी नाकातील रहिवासी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी व्यसनमुक्तीची शपथ घेऊन कार्यक्रमाचा समारोप झाला अशी माहिती नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य चे पालघर जिल्हा संघटक श्री मिलिंद रूपचंद पाटील यांनी दिली आहे.
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS