इंटरनॅशनल कार्गो टेर्मिनल येथील कामगार यांना व्यसनमुक्ती या विषयावर मार्गदर्शन संपन्न
दिनांक २३ सप्टेंबर २०२२ रोजी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ मुंबई विभाग गट कार्यालय नायगाव व नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने *" व्यसनमुक्ती या विषयावर मार्गदर्शन आणि पोस्टर प्रदर्शन चे"* इंटरनॅशनल कार्गो टेर्मिनल येथे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य चे पालघर जिल्हा संघटक मा. श्री. मिलिंद रूपचंद पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन केले.
मिलिंद पाटील यांनी मार्गदर्शनाची सुरूवात व्यसनमुक्ती ची शपथ देऊन करण्यात आली तसेच व्यसनांमुळे माणसास शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणामांना तोंड द्यावे लागते ( दारू, गुटखा, तंबाखू, सेगरट, अमली पदार्थ ) चे सेवन व त्यांचे दुष्परिणाम या विषयावर मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येते. तंबाखू च्या सेवनाच्या चक्र व्यूहातून तरूण पिढीला बाहेर काढून, निकोटीन व तंबाखू च्या व्यसनापासून प्रतिबंध करणे.
देशात प्रत्येक 16 सेकंदाला एक मूल तंबाखूचे पहिल्यांदा सेवन करतो तर दर दिवशी हा आकडा 5,500 मुलांपर्यंत जाते. तंबाखूविरोधी मानसिकता निर्माण करणे, तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनांचा समाजावर मोठा परिणाम होत आहे. अनेकांना कर्करोगासारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. असे सांगण्यात आले आहे. यावेळी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे सहाय्यक कल्याण आयुक्त श्री सयाजी पाटील व कामगार कल्याण अधिकारी संतोषजी साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम असे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल लोखंडे, इंटरनॅशनल कार्गो टेर्मिनल प्रा. लि. कंपनीचे ५० कामगार उपस्थित होते. इंटरनॅशनल कार्गो टेर्मिनल प्रायव्हेट लिमिटेड नवी मुंबई येथील माननीय श्री धनंजय बुलेसाहेब एच आर मॅनेजर माननीय श्री समीर पुनसे ऑपरेटर हेड व माननीय श्री सागर बांदेकर यांची उपस्थिती सदर कार्यक्रमाकरिता होते.
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS