Header Ads Widget

राष्ट्रीय सेवा योजना सप्ताह निमित्ताने जुचंद्र महाविद्यालयात व्यसनमुक्ती रॅली संपन्न

राष्ट्रीय सेवा योजना सप्ताह  निमित्ताने जुचंद्र महाविद्यालयात व्यसनमुक्ती रॅली संपन्न


दि. २९ सप्टेंबर २०२२ रोजी सह्याद्री शिक्षण सेवा मंडळाचे कला, वाणिज्य महाविद्यालय जुचंद्र तालुका वस‌ई जिल्हा पालघर व  नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, सलाम मुंबई फाउंडेशन यांचे संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना सप्ताह  निमित्ताने व्यसनमुक्ती रॅली चे आयोजन सह्याद्री शिक्षण सेवा मंडळाचे कला, वाणिज्य महाविद्यालय जुचंद्र  ते चंडिका देवी मंदिर पर्यंत व्यसनमुक्ती रॅली चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे सलाम मुंबई फाउंडेशन चे प्रतिनिधी, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य चे पालघर जिल्हा संघटक श्री मिलिंद रूपचंद पाटील  हे उपस्थित होते.  महाविद्यालय  चे प्राचार्य   मा. ललिता मुत्रेजा मॅडम यांच्या मार्गदर्शनावरून व्यसनमुक्ती रॅली चे  आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत राष्ट्रीय सेवा योजनेतील सहभागी विद्यार्थीनी  तंबाखू मतलब खल्लास !, हम सब एक है, तंबाखू जहर है !, तंबाखूचे व्यसन कॅन्सरला निमंत्रण!, एकमेकांची साथ देवूया तंबाखूचा नाश करूया !, तंबाखू सोडा आयूष्य जोडा !,  तंबाखू गुटखाचा पारा करी जिवनाचा नाश! या रॅलीत घोषणा देण्यात आल्या. 
 मिलिंद पाटील यांनी  व्यसनांमुळे माणसास शारिरीक, मानसिक व सामाजिक दुष्परिणामांना तोंड द्यावे लागते ( दारू, गुटखा, तंबाखू, सिगारेट, अमली पदार्थ ) चे सेवन व त्यांचे दुष्परिणाम या विषयावर मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येते. या वेळी  रॅलीत राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रोग्राम ऑफिसर श्रीमती वंदना सिंग, श्री. किर्तीकुमार पाटील कॉलेज चे प्राध्यापक नेहा दोडे, गीता गर्जे, महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
 यावेळी महाविद्यालय  चे प्राचार्य मा. ललिता मुत्रेजा मॅडम यांनी  व्यसनमुक्तीची शपथ घेऊन रॅली चे  समारोप करण्यात आले. तसेच या रॅलीचे सुत्रसंचलन राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रोग्राम ऑफिसर किर्तीकुमार पाटील तर आभार प्रदर्शन प्रा. वंदना सिंग यांनी केले. अशी माहिती नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य चे पालघर जिल्हा संघटक श्री मिलिंद रूपचंद पाटील यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments

AISSEE - 2025 Instructions and Procedure for Online Submission of Application Form