Header Ads Widget

"आम्ही विद्यार्थी, व्यसनमुक्तीचे सारथी - नारा गुंजला"

नशा मुक्त भारत अभियान अंतर्गत

"आम्ही विद्यार्थी, व्यसनमुक्तीचे सारथी - नारा गुंजला"

No LTD - नो व्यसन युथ अगेंस्ट एलटीडी, नशा म्हणजे नाश, आम्ही विद्यार्थी व्यसनमुक्तीचे सारथी अशा व्यसनमुक्तीच्या घोषणांनी आझाद मैदान ते गेट वे ऑफ इंडिया चा परिसर दुमदुमत होता. किन्नर माँ की बहने, मुंबईचा डबेवाला, नाका वर्कर, सफाई मित्र, हजारो शालेय व राष्ट्रीय सेवा योजना महाविद्यालयीन विद्यार्थी, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व्यसनमुक्तीसाठी रस्त्यावर उतरून निर्व्यसनी महाराष्ट्र सक्षम महाराष्ट्र असा संदेश मुंबईकरांना देत महाराष्ट्र नशामुक्ती साठी सर्वांना आवाहन करत होते. राष्ट्रपिता महात्मा गांधी लालबहादूर शास्त्री जयंतीच्या पूर्वसंध्येला आम्ही चालतो व्यसनमुक्तीसाठी रॅली 01 ऑक्टोबर दुपारी 03.00 वाजता आझाद मैदान ते गेटवे ऑफ इंडिया जिल्हाधिकारी शहर मुंबई, प्रादेशिक उपायुक्त, समाजकल्याण मुंबई विभाग, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण मुंबई शहर - मुंबई उपनगर, मुंबई विद्यापीठ एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो., नॅशनल युथ प्रोजेक्ट, प्रजापिता ब्रह्मकुमारीज, अखिल भारतीय नशामुक्ती अभियान (Aina) व नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
आझाद मैदान येथे मा. सलमा खान, संस्थापिका किन्नर माँ सामाजिक संस्था, श्री. अमित घावटे, मा.. झोनल डायरेक्टर, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मुंबई युनिट यांच्या हस्ते रँलीला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात झाली. व गेट वे ऑफ इंडिया येथे रॅलीची सांगता झाली.  या संकल्प सभेची प्रस्तावना नशाबंदी मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास यांनी केली. आज तरुणांच्या या मोहिमेला मिळणारा वाढता पाठिंबा पाहता आज महाराष्ट्राची वाटचाल जलद गतीने व्यसनमुक्त महाराष्ट्राकडे होत आहे याबद्दल समाधान व्यक्त करत राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांचे पणतू मा. तुषार भाई गांधी यांनी उपस्थित तरुणाईला मी कुठल्याही प्रकारचे व्यसन माझ्या आयुष्यात स्वतःला लागू देणार नाही. मी आजीवन निर्व्यसनी राहील. मी भारताचा नागरिक भारतातील प्रत्येक व्यक्ती निर्व्यसनी राहण्यासाठी मी प्रयत्नशील राहील. मी व्यसनमुक्तीसाठी असलेल्या कायद्यांचे काटेकोरपणे पालन करीन व नवीन कायदे होण्यासाठी मी सक्रिय राहील .मी सर्व नागरिकांमध्ये व्यसनमुक्त समाज निर्माण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील राहून अमली पदार्थांच्या विरोधात आयुष्यभर कार्यरत राहण्याचा संकल्प करीत आहे. मी राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज आणि राज्यघटनेचा आदर करीन. जय भारत ! जय व्यसनमुक्ती ! असा संकल्प उपस्थितांना दिला. यावेळी उपस्थित शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी, संस्था प्रतिनिधी, सहभागी संस्था  सहकार्य केले याबद्दल प्रजापिता ब्रह्मकुमारीस गावदेवी सेंटर च्या संचलिका मा. आशा दिदी यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नशाबंदी मंडळाचे चिटणीस - मुख्य संघटक अमोल स. भा. मडामे यांनी केले. अशी माहिती नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य चे पालघर जिल्हा संघटक श्री मिलिंद रूपचंद पाटील यांनी दिली.

Post a Comment

0 Comments

व्हिडीओ निर्मिती स्पर्धा 2023 निकाल लिंक

LEARN EXCEL PAGE SETUP - 1