राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्ताने खर्डी महाविद्यालयात व्यसनमुक्ती रॅली संपन्न
दि. ३ ऑक्टोंबर २०२२ रोजी जीवनदीप शैक्षणिक संस्था संचलित कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय खर्डी, तालुका शहापूर जिल्हा ठाणे व नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, राष्ट्रीय सेवा योजना यांचे संयुक्त विद्यमाने व्यसनमुक्ती रॅली चे आयोजन जीवनदीप शैक्षणिक संस्था संचलित कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय खर्डी ते खर्डी गाव पर्यंत व्यसनमुक्ती रॅली चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य चे पालघर जिल्हा संघटक श्री मिलिंद रूपचंद पाटील हे उपस्थित होते. जी. शै. संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. रवींद्र घोडविंदे सर यांच्या मार्गदर्शनावरून व्यसनमुक्ती रॅली चे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत राष्ट्रीय सेवा योजनेतील सहभागी विद्यार्थीनी तंबाखू मतलब खल्लास !, हम सब एक है, तंबाखू जहर है !, तंबाखूचे व्यसन कॅन्सरला निमंत्रण!, एकमेकांची साथ देवूया तंबाखूचा नाश करूया !, तंबाखू सोडा आयूष्य जोडा !, तंबाखू गुटखाचा पारा करी जिवनाचा नाश! या रॅलीत घोषणा देण्यात आल्या.
मिलिंद पाटील यांनी व्यसनांमुळे माणसास शारिरीक, मानसिक व सामाजिक दुष्परिणामांना तोंड द्यावे लागते ( दारू, गुटखा, तंबाखू, सिगारेट, अमली पदार्थ ) चे सेवन व त्यांचे दुष्परिणाम या विषयावर मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येते. या वेळी रॅलीत राष्ट्रीय सेवा योजना विभाग कार्यक्रम अधिकारी प्रा. अपर्णा जाधव प्रा. प्रियांका पवार प्रा. गणेश बदले प्राध्यापक महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
यावेळी महाविद्यालय चे प्राचार्य मा. प्रा. कैलास कळकटे यांनी व्यसनमुक्तीची शपथ घेऊन रॅली चे समारोप करण्यात आले. तसेच या रॅलीचे सुत्रसंचलन राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रोग्राम ऑफिसर प्रा. अपर्णा जाधव मॅडम तर आभारप्रदर्शन प्रा. संतोष साबळे, गांधीची वेशभूषा कु. उमेश राक्षे रा. से. यो. स्वयंसेवक यांनी केले अशी माहिती नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य चे पालघर जिल्हा संघटक श्री मिलिंद रूपचंद पाटील यांनी दिली आहे.
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS