निर्णयान्वये जाहीर करण्यात आला होता. सदर जाहिरातीद्वारे सर्व जिल्हा परिषदांतील विविध संवर्गातील एकूण
१८,९३९ पदे भरली जाणार आहेत.
२. विभागाच्या दि.१६ मार्च, २०२३ च्या शासन निर्णयान्वये दि.३१ डिसेंबर, २०२३ पर्यंत जिल्हा परिषद
सेवेत सरळसेवेने नियुकतीसंदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या सर्व जाहिरातींकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी कमाल
वयोमर्यादेत दोन वर्षे इतकी शिथिलता देण्यात आलेली आहे.
३. तसेच, माहे मार्च, २०१९ च्या जाहिरातीप्रमाणे यापूर्वी अर्ज केलेले/मरलेले आहेत, अशा सर्व
उमेदवारांना दि.३१ डिसेंबर, २०२३ पर्यंत जिल्हा परिषद सेवेत सरळसेवेने नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या सर्व
जाहिरातींकरिता अर्ज करण्यास पात्र करण्यात आले आहे. तसेच, मार्च, २०१९ च्या जाहिरातीप्रमाणे सदर
पदांसाठी असलेली दैक्षणिक अर्हता ही पुढील फक्त एका परीक्षेसाठी कायम ठेवण्यात आली आहे.
षः त्यानुसार सर्व जिल्हा परिषदांतील रिक्त पदांची बिंदुनामावली अंतिम करण्याचे काम पूर्ण झालेले
आहे. तथापि, सामान्य प्रशासन विभागाच्या दि.२१ नोव्हेंबर, २०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये दिलेल्या
निर्देशानुसार परीक्षा टी.सी.एस./आय.बी.पी.एस. या कंपन्यांद्वारे ऑनलाइन पद्धतीने घ्यावयाच्या आहेत.
त्यानुसार, 8२5 कंपनीसोबत बैठका घेऊन 140) अंतिम करण्यात आला आहे. सद्यस्थितीत, आय.बी.पी.एस.
कंपनीतर्फे सदर ५0) वर स्वाक्षरी करून संबंधित जिल्हा परिषदेला मुख्य कार्यकारी अधिकारी याचे स्वाक्षरी
करण्याकरिता सर्व नोडल अधिकारी तथा उप आयुक्त (आस्थापना), विभागीय आयुक्त कार्यालय यांचे
कार्यालयास पाठविण्यात आलेला आहे. त्यानुसार जि.प. स्तरावर MOU वर स्वाक्षर्या होऊन येत्या आठवड्यात
MOU करण्याची कार्यवाही पूर्ण होईल.
q. तसेच, Application Portal विकसित करण्याचे काम आय.बी.पी.एस. कंपनी स्तरावर सुरु करण्यात
आले असून, त्यासाठी लागणारा जाहिरातीचा नमुना, रिक्त पदांची आरक्षण प्रवर्ग निहाय माहिती व वयोमर्यादा व
शैक्षणिक अर्हतेबाबतची माहिती आय.बी.पी.एस. कंपनीस देण्याबाबत सर्व नोडल अधिकारी तथा उप आयुक्त
(आस्थापना) यांना कळविण्यात आले होते. तरी, सदर माहिती तात्काळ कंपनीस पाठविण्यात यावी, जेणेकरून
Application Portal विकसित करणे सुलभ जाईल.
६. तसेच, सदर कंपन्यांची एकाच वेळी परीक्षा घेण्याची क्षमता वर्धन करिता सदर कंपन्यांना श्ञासनाच्या
औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणक प्रणाली भाडेतत्वावर
उपलब्ध करून देण्याची शिफारस सचिव समितीने केली आहे. त्यानुसार विभागाच्या दि.१७.०२.२०२३ च्या
शासन पत्राद्वारे उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि कौशल्य, विकास व उद्दयोजगता विभागास कळविण्यात आलेले
आहे.
७ तथापि, या परीक्षेच्या आयोजनाबाबत परीक्षार्थींनी यासंदर्भात चौकशी केली असता जिल्हा
परिषदेकडून दिशाभूल करणारी माहिती दिली जात असल्याचे समजते आहे, ही बाब अत्यंत गंभीर आहे. तसेच,
गेल्या चार वर्षापासून पदभरती झाली नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. ही बाब विचारात घेता
पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.
अ. सर्व जिल्हा परिषदांनी सदर पदभरतीबाबत संक्षिप्त टिप्पणी /प्रेसनोट तयार करावी ज्यामध्ये शासनस्तरावर
सदर पदभरतीसाठी झालेली कार्यवाही, जिल्हा परिषद स्तरावर करण्यात आलेली कार्यवाही व
पदभरतीबाबतची सद्यस्थिती याचा अंतर्भाव असावा. तसेच, आगामी परीक्षा घेण्याबाबत चा Action Plan
असावा. सदर प्रेसनोट कार्यालयाच्या दर्शनीय भागात लावावी, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना याबाबतची
माहिती मिळू शकेल.
आ. सर्व जिल्हा परिषदांनी सदर पदभरतीची माहिती व sia निरसन करण्याकरिता हेल्पलाईन क्रमांक सुरु
करावा व सदर हेल्पलाईन क्रमांक आगामी पदभरती परीक्षा होऊन त्यातील यशस्वी विद्यार्थ्यांना नियुक्ती
मिळेपर्यंत कार्यालयीन वेळेत नेहमी सुरु ठेवण्यात यावा.
इ. पदभरती विषयास सर्वोच्च प्राथमिकता देण्यात येवून, याबाबतच्या कार्यवाहीस कोणताही विलंब होणार
नाही, याची दक्षता घेण्यात यावी.
सोबत : वरीलप्रमाणे. a RT >
“2 20" r=
(विजय चांदेकर)
उप सचिव, महाराष्ट्र झासन
प्र्तः
नोडल अधिकारी तथा उप आयुक्त (आस्थापना), विभागीय आयुक्त यांचे कार्यालय, “A
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS