Header Ads Widget

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार

*तुमच्यात उर्जा, प्रेरणा, धाडस, आणि सत्यता निर्माण करणारी महामानवाची काही वाक्ये....*

*१)* "शिका...! 
संघटीत व्हा...!
संघर्ष करा....!"
     *- डॉ. बाबासाहेब आंबेडकर*

*२)* "तुमच्या मताची, किंमत मीठमिरची इतकी समजू नका. त्यातील सामर्थ्य ज्या दिवशी तुम्हाला कळेल तेव्हा ते, मत विकत घेऊ पाहणाऱ्याइतके कंगाल कोणीच नसेल..."
       *- डॉ. बाबासाहेब आंबेडकर*.

३) "लोकांच्या अंगात देवी, भुतच कां येतात.., 
न्युटन आयझॅक, कोपर्निकस यांच्यासारखे शास्त्रज्ञ कां येत नाहीत...?
जेव्हा शास्त्रज्ञ अंगात येतील तेव्हा भारत जगावर राज्य करेल..."
      - डॉ. बाबासाहेब आंबेडकर*.

४) "समता, स्वातंत्र्य, विश्वबंधुत्व या तीन तत्वावर आधारित जीवनमार्ग म्हणजे लोकशाही. 
समता, स्वातंत्र्य, सहानुभूती यानेच व्यक्तीचा विकास होतो."
      - डॉ. बाबासाहेब आंबेडकर*.

*५) "माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये. लाज वाटायला पाहिजे ती आपल्या दुर्गुणांची...."
      *-डॉ. बाबासाहेब आंबेडकर*.

*६)* "प्रज्ञा, शील, करुणा, विद्या, मैत्री या पंचतत्वावर प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चरित्र बनविले पाहिजे..."
      *- डॉ. बाबासाहेब आंबेडकर*.

*७)* "मोठ्या गोष्टींचे बेत करण्यापेक्षा छोट्या गोष्टीने आरंभ करणे अधिक श्रेयस्कर ठरते..."
        *- डॉ. बाबासाहेब आंबेडकर*

८) "जेथे एकता~
तेथेच सुरक्षितता"
      - डॉ. बाबासाहेब आंबेडकर*.

९) "काम लवकर करावयाचे असेल, तर मुहूर्त पाहण्यात वेळ घालवू नका."
       - डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

१०) "दैवावर भरवसा ठेवून वागू नका, जे काम करावयाचे असेल ते आपल्या मनगटाच्या जोरावर करा..."
     - डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

११) "आत्मोद्धार हा दुसर्‍याच्या कृपेने होत नसतो, 
तो ज्याचा त्याने करायचा असतो..."
     - डॉ. बाबासाहेब आंबेडकर*.

१२) "विचारक्रांती झाल्याशिवाय आचारात फेरबदल होवू शकत नाही.
आचारात फेरबदल करावयाचा झाल्यास आधी मनावर बसलेल्या जुन्या विचारांची छाप काढून टाकणे अगदी अगत्याचे आहे...."
      - डॉ. बाबासाहेब आंबेडकर*.

१३) " माणूस हा धर्मा करीता नसून, धर्म हा माणसा करिता आहे..."
       - डॉ. बाबासाहेब आंबेडकर*.

१४) "सेवा जवळून, आदर दुरून, व ज्ञान आतून असावे..."
       - डॉ. बाबासाहेब आंबेडकर*.

१५) "जो प्रतिकूल लोकमताला घाबरून जात नाही, 
दुसऱ्यांचे हातचे बाहुले न होण्याईतकी बुद्धी ठेवतात, 
स्वाभिमान ज्याला आहे, 
तोच माणूस स्वतंत्र आहे असे मी समजतो."
       *- डॉ. बाबासाहेब आंबेडकर*.

१६) "स्वातंत्र्याचे हक्क भीक मागून मिळत नसतात, 
ते स्व-सामर्थ्याने संपादन करावयाचे असतात, 
देणगी म्हणून ते लाभत नसतात..."
      - डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

१७) "ज्याप्रमाणे कोणत्याही राष्ट्राला दुसर्‍या राष्ट्रावर राज्य करण्याचा अधिकार नाही,
त्याचप्रमाणे, कोणत्याही एका विशिष्ट वर्गाला दूसर्‍या वर्गावर अधिसत्ता गाजविण्याचा अधिकार नाही..."
डॉ. बाबासाहेब आंबेडकर*.

१८) "माझा जन्म सर्वसाधारण जनतेची जबाबदारी घेण्यासाठी असावा."
     - डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

१९) "तुम्ही आपली गुलामगिरी नष्ट करा.
स्वाभिमान शुन्यतेचे जीवन जगणे नामर्दपणाचे आहे."
      - डॉ. बाबासाहेब आंबेडकर*.

२०) "आपण मला देवपदाला चढवू नका. एखाद्या व्यक्तीला देवपदाला चढवून इतराने आंधळेपनाने त्याच्या मागे धावत जावे, हे मी तरी कमकुवतपनाचे लक्षण मानतो..."
     - डॉ. बाबासाहेब आंबेडकर*

२१) "माणसाने खावे जगण्या साठी, 
पण जगावे समाजासाठी...."
      - डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

२२) "दुसर्याच्या सुख -दु:खात भागीदार व्हावयास शिकणे हेच खरे शिक्षण आहे..."
       - डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

२३) "पती आणि पत्नी यांच्यातील संबंध जवळच्या मित्रांसारखे असावेत..."
      - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

२४) नाचुन मोठे होऊ नका तर,
वाचून मोठे व्हा.......!!
       - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

२५) माझ्या नावाचा जयजयकार करण्यापेक्षा 
माझे अपुर्ण राहीलेले काम प्राणपणाने पुर्ण करा.....-
     - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

२६) जर तुमच्याकडे दोन नाणी असतील तर.एका नाण्याची भाकर घ्या आणि एका नाण्याचे पुस्तक घ्या...भाकर तुम्हाला जगविल..तर पुस्तक जगण्याची कला शिकवेल...
     - डॉ. बाबासाहेब आंबेडकर*

२७) "जुल्म करने वालों से जुल्म सहने वाला ज्यादा गुनहगार होता है"!
   — डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Post a Comment

0 Comments

महाराष्ट्र मंत्रीमंडळ खाते वाटप जाहीर

LEARN EXCEL PAGE SETUP - 1