Header Ads Widget

NPS WITHDRAWAL RULES UPDATED

NPS WITHDRAWAL RULES UPDATED

पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीने (PFRDA) राष्ट्रीय पेन्शन प्रणाली योजनेत (एनपीएस) गुंतवणूक केल्लेल्या सदस्यांना वेळेवर वार्षिक उत्पन्न पेमेंट सुनिश्चित करण्यासाठी काही कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य करणारे परिपत्रक जारी केले आहे. ही कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय पेन्शनची रक्कम काढता येणार नाही. १ एप्रिल २०२३ पासून नवा नियम लागू झाला आहे.


NPS सदस्यांसाठी पैसे काढण्याचे नियम बदलले आहेत


आता पेन्शन फंड काढण्यापूर्वी काही कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक

नियम १ एप्रिल २०२३ पासून लागू करण्यात आला

राष्ट्रीय पेन्शन प्रणाली किंवा NPS मध्ये गुंतवणूक केलेल्या सर्व सदस्यांसाठी पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाने (PFRDA) एक परिपत्रक जारी केले आहे. आतापासून पेन्शन काढण्याचे नियम बदलले आहे. पेन्शन नियामकने नवीन नियम जारी केले असून ते नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या तारखेपासून म्हणजे १ एप्रिल २०२३ पासून लागू झाले आहेत. अशा स्थितीत आता NPS किंवा राष्ट्रीय पेन्शन प्रणालीत गुंतवणूक करणाऱ्यांना पेन्शनचे पैसे काढण्यासाठी काही महत्त्वाची कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक असेल. हे दस्तऐवज अपलोड केल्यास वार्षिकी उत्पन्नाची देयके वेळेवर भरण्याची खात्री होईल.

कोणते दस्तऐवज अपलोड करणे अनिवार्य
PFRDAने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, प्राधिकरणाने निर्गमन आणि वार्षिकी प्रक्रियेसाठी पैसे काढणे आणि केवायसी कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य केले आहे. या अंतर्गत, NPS पैसे काढणे/एक्झिट फॉर्म व्यतिरिक्त सदस्यांना ओळखपत्र आणि पत्ता पुरावा देखील अपलोड करणे बंधनकारक असेल. ही दोन्ही कागदपत्रे पैसे काढण्याच्या फॉर्ममध्ये नमूद केल्याप्रमाणेच असणे आवश्यक आहे. याशिवाय बँक खात्याचा पुरावा आणि परमनंट रिटायरमेंट अकाउंट नंबरची (PRAN कार्ड) प्रत अपलोड करणे देखील आवश्यक असेल.

NPS नियम काय?
राष्ट्रीय पेन्शन प्रणालीतून बाहेर पाडण्यासाठी निवृत्तीचे वय ६० वर्षे पूर्ण होण्यापूर्वी किंवा नंतर पेन्शन योजनेतून पैसे काढता येतात. असे केल्यास तुम्हाला ॲन्युइटी सर्व्हिस प्रोव्हायडर (ASP) कडून ॲन्युइटी खरेदी करण्यासाठी जमा झालेल्या रकमेपैकी ४०% वापरावी लागेल. याशिवाय, उर्वरित रक्कम ५ लाख रुपयांपेक्षा कमी असल्यास रक्कम एकाच वेळी काढता येईल.

NPS चा नवीन नियम
PFRDAच्या नवीन नियमांनुसार, पेन्शन काढण्याच्या प्रक्रियेतील पहिली पायरी म्हणजे ऑनलाइन एक्झिट रिक्वेस्ट सुरू करण्यासाठी CRA सिस्टममध्ये लॉग इन करावे लागेल. विनंती सुरू केल्यानंतर तुम्हाला ई-साइन/OTP प्रमाणीकरण, नोडल ऑफिस/पीओपी प्राधिकरणाविषयी माहिती दिसू लागेल. ही प्रक्रिया तुमच्या एनपीएस खात्यातून सुरू झाल्यानंतर बँक तपशील, पत्ता आणि इतर माहिती आपोआप पैसे काढण्याच्या फॉर्ममध्ये भरली जाते.

आता प्रक्रियेच्या दुसऱ्या पायरीत ॲन्युइटी आणि काढता येण्याजोग्या कॉर्पस, ॲन्युइटी तपशीलांसाठी निधी वाटपाची टक्केवारी निवडण्याचा पर्याय मिळेल. पेनी ड्रॉप व्हेरिफिकेशन वापरून तुमच्या बँक खात्याची ऑनलाइन पडताळणी केली जाईल. बाहेर (एक्झिट) पडण्याचा अर्ज सबमिट करताना तुम्हाला KYC कागदपत्रे (ओळख आणि पत्ता पुरावा), PRAN कार्ड/E-PRAN कॉपी आणि बँक दस्तऐवज अपलोड करावे लागतील.

दरम्यान, कागदपत्रे अपलोड करताना सर्व दस्तऐवज चांगले स्कॅन केलेले आणि वाचनीय असावेत हे सुनिश्चित करा. यानंतर, शेवटच्या टप्प्यात तुम्ही OTP प्रमाणीकरण किंवा ई-साइन पर्याय निवडून प्रक्रिया पूर्ण करू शकता. पहिल्या पर्यायामध्ये तुमच्या नोंदणीकृत फोन नंबर आणि ई-मेल आयडीवर OTP पाठवला जाईल आणि दुसऱ्या पर्यायामध्ये तुम्ही तुमचे आधार कार्ड वापरून विनंतीवर ई-साइन करू शकता.

Post a Comment

0 Comments

महाराष्ट्र मंत्रीमंडळ खाते वाटप जाहीर

LEARN EXCEL PAGE SETUP - 1