Header Ads Widget

नियतकालिक मूल्यांकन (PAT) अंतर्गत संकलित मूल्यमापन चाचणी २ आणि इयत्ता पाचवी व आठवी वार्षिक परीक्षेसंदर्भात सुधारित सूचना देणेबाबत....

संकलित मूल्यमापन सत्र दोन सुधारित सूचना
 संकलित मूल्यमापन सत्र दोन सुधारित सूचना



विषय: नियतकालिक मूल्यांकन (PAT) अंतर्गत संकलित मूल्यमापन चाचणी २ आणि इयत्ता पाचवी व आठवी वार्षिक परीक्षेसंदर्भात सुधारित सूचना देणेबाबत....

संदर्भ: १. शासन निर्णय क्रमांक: आरटीई -२०२२/प्र.क्र.२७६/एसडी.-१ दि. ०७.१२.२०२३

२. प्रस्तुत कार्यालयाचे पत्र क्र. राशैसंप्रपम/मूल्यमापन/PAT - संमू - २/२०२३-२४/११८२ दि. ०७.०३.२०२४

उपरोक्त विषयाच्या अनुशंगाने संदर्भ क. २ अन्वये नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) - (संकलित


मूल्यमापन - २) व इयत्ता पाचवी व आठवी वार्षिक परीक्षेच्या आयोजनासंदर्भात सविस्तर सूचना देणेत आलेल्या होत्या. त्या अनुषंगाने सदर परीक्षांच्या बाबतीतील अधिक स्पष्टीकरणासाठी सविस्तर सूचना खालीलप्रमाणे आहेत. नियतकालिक मूल्यांकन अंतर्गत (संकलित मूल्यमापन - २)

२. नियतकालिक मूल्यांकन अंतर्गत संकलित मूल्यमापन २ द्वारे शासकीय व स्थानिक स्वराज संस्थांच्या आणि खाजगी अनुदानित शाळेतील इयत्ता तिसरी ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांची प्रथम भाषा, गणित व इंग्रजी या विषयांची दहा माध्यमात चाचणी घेण्यात येणार आहे. यासाठी राज्यस्तरावरून प्रश्नपत्रिका. उत्तर पत्रिका व उत्तर सूची पुरविण्यात येणार आहेत.


 3. संदर्भ क्र. २ नुसार दिनांक ०२.०४.२०२४ ते ०४.०४.२०२४ या कालावधीत संकलित मूल्यमापन २ घेण्यचे नियोजन कळविण्यात आलेले होते, परंतु काही तांत्रिक कारणास्तव सदर संकलित मूल्यमापन - २ ही दि. ०४.०४.२०२४ ते ०६.०४.२०२४ या कालावधीमध्ये घेण्यात यावी. त्याचा सविस्तर तपशीलपु ढीलप्रमाणे.



३. इयता ३ री. ४ थी, ६ वी व ७ ची या इयत्तांना प्रथग भाषा, गणित व इंग्रजी हे विषय सोडून इतर विषयांच्या संकलित मूल्यमापन -२ च्या प्रश्नपत्रिका वर्ग/विषय शिक्षकांनी स्वतः तयार करून नियमानुसार आपल्या


४. शाळेपुरते परीक्षा घेण्याचे नियोजन करावे. वेळापत्रकात दिलेल्या वेळेत शाळेच्या स्थानिक गरजेनुसार बदल करता येतील परंतु दिनांक, विषय व इतर बाबतीत बदल करण्यात येऊ नयेत.

५ . संकलित मूल्यमापन -२ अंमलबजावणी संदर्भात संदर्भ क्र. २ नुसार सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत. त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.


इयता पाचवी व आठवीसाठी वार्षिक परीक्षाः

२. संदर्भ क्र. १ च्या शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे इयता पाचवी व आठवी करिता शिक्षकांनी स्वतः शालेय स्तरावर प्रश्नपत्रिकांची निर्मिती करून सर्व विषयांची वार्षिक परीक्षा एप्रिल महिन्याच्या दुसन्या आठवड्यात घेण्याचे नियोजन करावे. तसेच पुनर्परीक्षा व निकालासंदर्भात कार्यवाही करावी.


४. याकरिता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे च्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या नमुन्याप्रमाणे प्रश्नपत्रिका तयार कराव्यात व वार्षिक परीक्षा घेणेत यावी. यासाठी राज्यस्तरावरून प्रश्नपत्रिका पुरविण्यात येणार नाहीत याची नोंद घ्यावी.

५. इयत्ता पाचवी व आठवी या वर्गाना PAT अंतर्गत उपरोल्लेखित तक्त्याप्रमाणे तीन विषयांची संकलित


मूल्यमापन २ व शासन निर्णयानुसार या तीन विषयांसह सर्व विषयांची वार्षिक परीक्षा या दोन्ही परीक्षा स्वतंत्रपणे घेणे बंधनकारक आहे. ज्या शाळांना शासना मार्फत घेण्यात येणारी PAT-३ लागू नाही त्यांनी फक्त सर्व विषयांच्या वार्षिक परीक्षेचे नियोजन विहित प्रक्रियेने करावयाचे आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖







Post a Comment

0 Comments

व्हिडीओ निर्मिती स्पर्धा 2023 निकाल लिंक

LEARN EXCEL PAGE SETUP - 1