महाराष्ट्र शासनाने दिनांक 29 जुलै 2024 रोजी एक अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयानुसार, राज्यातील दिव्यांग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षणाचा लाभ देण्यात येणार आहे. हा निर्णय दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या कारकिर्दीवर दूरगामी परिणाम करणारा ठरणार आहे.
आरक्षणाचे स्वरूप:
सामान्य प्रशासन विभागाने निर्गमित केलेल्या या शासन निर्णयानुसार, राज्य शासन सेवेतील दिव्यांग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गट ड ते गट अ च्या निम्न स्तरापर्यंतच्या पदांमध्ये पदोन्नतीमध्ये चार टक्के आरक्षण देण्यात येणार आहे. हे आरक्षण दिनांक 30 जून 2016 पासून लागू करण्यात येत आहे. सदर आरक्षण हे पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात येणार आहे.
दिव्यांग कर्मचाऱ्यांना दिनांक 20 एप्रिल 2023 रोजीच्या निर्णयात नमूद केलेल्या पात्रता अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.
या अटींच्या पूर्ततेच्या अधीन राहून, दिनांक 30 जून 2016 पासून काल्पनिक पद्धतीने गट अ च्या निम्नस्तरापर्यंत पदोन्नतीमध्ये आरक्षणाचा लाभ अनुज्ञेय करण्यात येणार आहे.
ज्या दिनांकाला दिव्यांग अधिकारी किंवा कर्मचारी पदोन्नतीसाठी पात्र ठरेल, त्या दिनांकापासून त्यांना काल्पनिक रीत्या पदोन्नतीमधील आरक्षणाचा लाभ देण्यात येणार आहे.
मात्र, पदोन्नतीचा प्रत्यक्षात आर्थिक लाभ त्यांना प्रत्यक्षात पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून लागू होणार आहे.
राज्य शासकीय सेवा
निमशासकीय सेवा
शासनाचे उपक्रम
सर्व शासकीय मंडळे
प्राधिकरणे
स्थानिक स्वराज्य संस्था
जिल्हा परिषदा
महानगरपालिका
नगरपालिका
शासन अनुदानित संस्था
ज्यांना आदेश देण्याचा अधिकार शासनास आहे अशा सर्व संस्था व सेवा
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS