डी गुकेश बुद्धिबळ विश्वविजेता
भारताचा गुकेश विश्वविजेता... जागतिक बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता... डिंग डिरेनला चेकमेट...
डोम्माराजू गुकेश (जन्म २९ मे २००६), जो गुकेश डी या नावाने ओळखला जातो, हा एक भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर आहे. गुकेश हा इतिहासातील तिसरा सर्वात लहान ग्रँडमास्टर आहे, ज्याला FIDE ने मार्च २०१९ मध्ये ग्रँडमास्टर पद दिले होता.[१] बुद्धीबळात २७०० गुणांचे रेटिंग पूर्ण करणारा तो इतिहासातील तिसरा सर्वात लहान खेळाडू आहे तर २७५० गुणांचे रेटिंग पूर्ण करणारा सर्वात लहान खेळाडू आहे.
१६ ऑक्टोबर २०२२ रोजी, वयाच्या सोळाव्या वर्षी, त्याने तत्कालीन जगज्जेता मॅग्नस कार्लसनला पराभूत करणारा सर्वात लहान खेळाडू बनण्याचा विक्रम केला.
२०२४ मध्ये आव्हानवीरांची स्पर्धा जिंकून जागतिक विजेतेपद स्पर्धेसाठी पात्र ठरलेला तो जगातील सर्वांत कमी वयाचा खेळाडू ठरला.
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS