: इंदुराणी जाखर यांची कल्याण डोंबिवलीच्या आयुक्तपदावरून पालघरच्या जिल्हाधिकारी पदावर बदली करण्यात आली आहे.
मुंबई : राज्याच्या वरिष्ठ आयएएस अधिकारी इंदुराणी जाखर यांची बदली पालघरच्या जिल्हाधिकारीपदी करण्यात आली आहे. तसे आदेश मंत्रालयातून काढण्यात आले आहेत. इंदुराणी जाखर (Indurani Jakhar IAS) यांच्याकडे कल्याण डोंबिवली आयुक्तपदाचा कार्यभार होता. आता पालघरच्या जिल्हाधिकारीपदाचा कार्यभार (Palghar District Collector) त्वरीत घ्यावा असे आदेशात म्हटलं आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सिलसिला सुरूच आहे. त्यामध्ये आता इंदुराणी जाखर यांच्या बदलीचे आदेश निघाले आहेत. पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या निवृत्तीनंतर त्यांची वर्णी लागली आहे.
कोण आहेत इंदुराणी जाखर?
इंदुराणी जाखर या 2016 बॅचच्या आयएएस अधिकारी असून यूपीएससीच्या दुसऱ्याच प्रयत्नात त्यांनी देशात 30 वा क्रमांक पटकावला. जाखर या मूळच्या हरियाणातील झज्जरमधील आहेत. पण नंतर त्यांचा परिवार हा दिल्लीमध्ये स्थायिक झाला. त्यांचे वडील हे दिल्ली पोलिसमध्ये होते.
इंदुराणी जाखर यांनी 2013 साली एमबीबीएसची पदवी घेतली. त्यानंतर यूपीएससीची तयारी सुरू केली. दुसऱ्याच प्रयत्नात त्यांनी 30 वा क्रमांक पटकावून आयएएस पद मिळवलं. इंदुराणी यांचे पतील मोहित कुमार गर्ग असून ते आयपीएस अधिकारी आहेत.
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS