(महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था) मुख्यालय २८ क्वीन्स गार्डन, कैम्प, पुणे ४११००१
जा.क्र./बार्टी/योजना/जेईई-नोट/२०२५-२६/३२५९
दिः १४/५/२५
सूचना
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे मार्फत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना' ज्या विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीमध्ये ९०% किंवा त्याहून अधिक गुण मिळवले आहेत अशा विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या पूर्व तयारीसाठी बार्टीच्या माध्यमातून रू. २,००,०००/- देण्याच्या योजनेची जाहिरात २०२१ साली प्रसिध्द करण्यात आली होती. तथापि सदर योजनेची अंमलबजावणी झाली नसल्याने सदर योजना सद्यस्थितीत सुरू नाही. व्हॉट्सअप व इतर इलेक्ट्रॉनिक मिडिया मार्फत सदर योजनेची जाहिरात प्रसिद्ध होत असून याबाबत पालक व विद्यार्थी यांच्याकडून विचारणा होत आहे. याबाबत विद्यार्थी व पालकांना कळवण्यात येते की सदर योजना बार्टी, पुणे मार्फत राबविण्यात येत नाही.
(सुनिल वारे)
महासंचालक डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे.
👉 सदरील योजना राज्यात लागू नाही.. त्यामुळे आपण काळजी घ्यावी.. फसगत होणार नाही याची दक्षता पालकांनी घ्यावी.. The Education
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS