पायाभूत मूल्यमापन चाचणी 2025 (PAT-१) बाबत
संदर्भ
: १) जा.क्र/राशैसंप्रपम/मूल्यमापन/पा.चा. जिल्हा पत्र/२०२५-२६,
दि. ०८/०७/२०२५ थे पत्र.
२) जाक्र/ठाजिप/शिक्षण/प्राथ/सशि/पामुचाचणी/६३७, दि. २४/०७/२०२५.
महोदय,
उपरोक्त संदर्भिय विषयान्वये सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात इयत्ता २ री ते ८ वी विद्याथ्यांसाठी तीन नियतकालिक मूल्यांकन चाचण्याचे (PAT) आयोजन करण्यात येत आहे. त्यानुसार सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी १ व २ अशा तीन नियतकालिक चाचण्यांचे (PAT) नियोजन करण्यात आलेले आहे. पायाभूत मूल्यमापन चाचणी (PAT-१) दिनांक ६ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे. परंतू दिनांक ०८ ऑगस्ट २०२५ रोजी नारळी पौर्णिमा निमित्त संदर्भ क्र. २ अन्वये सर्व शाळांना शासकीय सुटटी जाहीर केली आहे. तसेच दिनांक ९ ऑगस्ट २०२५ रोजी जागतिक आदिवासी दिन / रक्षाबंधन हे सण असल्याने सदर दिवशी शाळांना सुटटी जाहीर झाली आहे. त्यामूळे दिनांक ८ ऑगस्ट २०२५ रोजी असलेला तृतीय भाषा इग्रजी (सर्व माध्यम) हा पेपर दिनांक ११ ऑगस्ट २०२५ रोजी पत्रात नमुद केलेल्या सुचनेनुसार लेखी व तोंडी परीक्षा घेण्याबाबत आपल्या स्तरावरुन मार्गदर्शन/मान्यता मिळावी ही विनंती.
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS