HEADER

सेवा पुस्तकातील नोंदी भाग 2 नियुक्ती तपशील बाबी

      सेवा पुस्तकातील नोंदी भाग 2 



अ) नियुक्तीचा तपशील :-

१) शासकीय सेवेत प्रथम नियुक्तीचा दिनांक.

२) कार्यालयाचे नाव व पदनाम,

३) प्रथम नियुक्तीच्या आदेशाची प्रत.

४) वैद्यकीय तपासणी अहवालाची नोंद. (प्रमाणपत्र सेवापुस्तकात जोडलेले असावे.)

५) चारित्र्य पडताळणी अहवाल प्राप्त झाल्याचा दिनांक.

६) प्रथम पृष्ठावरील जन्मतारीख पडताळणीची नोंद.

(७) शासन अधिसूचना क्र. मनासे-२०१९/प्र.क्र.१९/सेवा-६ दि.३० डिसेंबर २०२१ अन्वये म.ना.से. (सेवेच्या सर्वसाधारण शर्ती) नियम ३८ (२) (ए) नुसार परिशिष्ट-पाच "अ" मध्ये हमीपत्र घेण्यात यावे.

८) जात प्रमाणपत्राची व जात पडताळणी प्रमाणपत्राची नोंद. (लागू असल्यास)

९) स्वग्राम घोषित केल्याची नोंद,

१०) परिवीक्षाधीन कालावधी पूर्ण केल्याची नोंद.

११) सेवेत कायम करण्यात आल्याची नोंद. (स्थायित्व प्रमाणपत्र)

१२) शैक्षणिक अर्हता

१३) मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण/सूट देण्याच्या आदेशाची नोंद.

१४) हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण/सूट देण्याच्या आदेशाची नोंद.

१५) मराठी / इंग्रजी टंकलेखन व लघुलेखनाच्या परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या / सुट दिल्याची नोंदी.

१६) संगणक अर्हता परीक्षा उत्तीर्ण, सूट देण्याच्या आदेशाची नोंद.

१७) सेवा प्रवेशोत्तर परीक्षा, विभागीय परीक्षा, पर्यवेक्षिय परीक्षा इत्यादी उत्तीर्ण झाल्याची / सूट देण्याच्या आदेशाची नोंद.

१८) सेवा कालावधीत, विवाहानंतरच्या नाव बदलाबाबतची नोंद (लागू असल्यास).

१९) सेवातंर्गत प्रशिक्षण नोंद.

२०) वार्षिक वेतनवाढ मंजुरी नंतर सेवापुस्तकातील रकाना क्रमांक ८ मध्ये अधिकारी / कर्मचाऱ्याची स्वाक्षरी घेणे.

२१) सेवा कालावधीत नियमित / तदर्थ पदोन्नतीची नोंद.

२२) सेवार्थ अथवा अन्य वेतन प्रणालीमधील अनोखाओळख (Unique ID) क्रमांकाची नोंद.

२३) भविष्य निर्वाह निधी खाते क्रमांकाची नोंद.

२४) DCPS, PRAN क्रमांकाची नोंद.

२५) वेळोवेळी झालेल्या बदल्या, बदलीच्या ठिकाणी रूजू झाल्याचा दिनांक व सक्तीचा प्रतीक्षाधीन कालावधी

असल्यास त्याची नोंद.

२६) अधिकाऱ्यांच्या संपूर्ण सेवाविषयक बाबींची नोंद

२७) अधिकारी, कर्मचारी यांच्या कायम, ताप्तपुरत्या निवासस्थानाचा अद्ययावत पत्ता.

२८) अधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानाची अद्ययावत नोंद.

२९) अधिकारी/कर्मचारी यांच्या कुटुंबातील सदस्यांचा पूर्ण तपशील. (म.ना.से. (निवृत्तिवेतन) नियम १९८२ मधील नियम क्र. ११६ विहित नमुन्यात)

३०) मर्यादित कुटुंबाचे प्रमाणपत्र.

३१) सेवापुस्तकाचे प्रथम पृष्ठ पूर्ण भरणे. आवश्यक तेथे साक्षांकन, पडताळणी, खाडाखोड अथवा बदल, दुरूस्ती असल्यास योग्य ती नोंद घेऊन साक्षांकित करणे,

३२) वयाच्या ५०/५५ वर्षी सेवा पुनर्विलोकन झाल्याच्या नोंदी.

३३) सेवा निवृत्तीसंबंधी नोंद स्पष्ट आदेश व नियम ज्या अंतर्गत सेवानिवृत्त आहे, त्या सहित सेवापुस्तिकेत नोंद घ्यावी.

३४) तात्पुरते निवृत्तिवेतन, मृत्यू-नि-सेवानिवृत्ती उपदान दिले असल्यास आदेशासह नोंद सेवापुस्तकात घेण्यात यावी. (प्रमाणक क्रमांक व दिनांक)

३५) दुय्यम सेवापुस्तक तयार करून संबंधित अधिकारी यांनी प्रमाणित करून कर्मचाऱ्यांस देणे व मूळ सेवापुस्तकात स्वाक्षरी घेणे,

Post a Comment

0 Comments

सलग तिसऱ्या वर्षी वडवली पुनर्वसन शाळेत ग्रामस्थांकडून शिक्षकांचा सन्मान