Header Ads Widget

STUDENT PROMOTION 2024:25 Maharashtra Education Portal : SARAL 2.0

        STUDENT PROMOTION 2024:25 
Maharashtra Education Portal : SARAL 2.0
                 अत्यन्त महत्त्वच्या सूचना 
 
शाळांसाठी नवीन सूचना
1) शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ करता प्रमोशन सुरु करण्यात आले आहे.

Maharashtra Education Portal : SARAL 2.0 - Systematic Administrative Reforms for Achieving Learning by Students

2) सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात शाळेत नियमित शिक्षण घेत असलेल्या विध्यार्थ्याची आधार क्रमांक विषयक नोंदी करून शाळेतील सर्वच विध्यार्थ्याचे आधार वैध (valid) करावेत, जेणेकरून संच मान्यता २०२४-२५ साठी ऐनवेळी अडचणी निर्माण होणार नाहीत.


शाळांसाठी नियमित सूचना

1) एखाद्या शाळेने Attach , ट्रान्सफर , ट्रान्सफर(आऊट ऑफ स्कूल ) या Option द्वारे Request केलेले विध्यार्थी जर जुन्या शाळेने व केंद्रप्रमुख तसेच गट शिक्षणाधिकारी यांनी विहीत मुदतीत Approve/Reject करणे आवश्यक आहे. तसे न केल्यास सदर Request ५२ दिवसानंतर रद्द करण्यात येतील. अशा विद्यार्थ्याची शाळा नव्याने Request टाकू शकते.


2) एखाद्या शाळेने त्यांच्या शाळेत नव्याने प्रवेश झालेल्या विद्यार्थ्याची त्याच्या जुन्या शाळेस online Request पाठविल्यानंतर सदर Request जुन्या शाळेने ७ दिवसात Approve/Reject करणेआवश्यकआहे, विहीत मुदतीत जुन्या शाळेने तसे न केल्यास सदर Request सबंधित शाळेच्या केंद्रप्रमुख यांचेकडे जाईल व केंद्रप्रमुख सदर विद्यार्थी बाबत खात्री करून प्राप्त Request ही Approve/Reject १५ दिवसात करतील.


3) शाळेने केलेली first time Request जर केंद्रप्रमुख यांनी Reject केल्यास सदर Request नवीन शाळेसाठी पुन्हा (३ दिवसाच्या मुदतीसाठी) उपलब्ध होईल .



4) जर जुन्या शाळेने सदर online Request प्राप्त झाल्यानंतर जर ७ दिवसात Reject केली तर नवीन शाळा विद्यार्थी त्यांचेकडे शिकत असल्यास पुन्हा त्याच जुन्या शाळेस online Request पाठवतील व सदर शाळेने ३ दिवसाच्या मुदतीत Approve/Reject करणेआवश्यकआहे, विहीत मुदतीत जुन्या शाळेने काहीच कार्यवाही न केल्यास अथवा Reject केल्यास सदर Request सबंधित शाळेच्या केंद्रप्रमुख यांचेकडे जाईल व केंद्रप्रमुख सदर विद्यार्थी बाबत खात्री करून प्राप्त Request ही Approve/Reject १५ दिवसात करतील.


5) जर केंद्रप्रमुख यांनी प्राप्त Second time Request Reject अथवा १५ दिवसाच्या मुदतीत काहीच न केल्यास सदर online Request ही BEO Level ला १ महिण्याच्या मुदतीत Approve/Reject साठी उपलब्ध असतील .


6) सन २०२३-२४ मधील विद्यार्थ्याचे आधार वैध करण्यासाठी वेळोवेळी मुदत देऊनही अद्यापही काही शाळांतील विद्यार्थी Without AadhaarStudent/Invalid/Mismatch मध्ये दिसून येत आहेत. सदर विध्यार्थ्यांना आता पुढील वर्गात सन २०२४-२५ साठी promotion केले असले तरी असे विध्यार्थी आधार वैध स्थितीत नसतील तर त्या विधार्थ्याचे आधार वैध valid करता येणार आहे, त्यामुळे WithoutAadhaarStudent/Invalid/Mismatch बाबत शाळांनी काम करणे योग्य राहील.

🎈




विद्यार्थी आधार कार्ड बाबत सर्व साधारण सूचना
Verify icon Imagesशाळांनी विध्यार्थ्याची आधार कार्ड वरील माहिती student portal मध्ये शाळेने लॉगीन वर नोंद करणे आवश्यक आहे.


Verify icon Imagesशाळांना student portal वर report मेनू मध्ये विद्यार्थी विषयक विविध मेनू दिलेले आहेत.


Verify icon Imagesशाळांना aadhaar status असा मेनू देलेला आहे त्यातील शाळेच्या udise code वर क्लिक केल्यानंतर इयत्ता निहाय शाळेतील सर्व विधार्थ्याची आधार विषयक सर्व संख्यात्मक माहिती मिळेल. त्यामध्ये इयता,शाखा, तुकडी, Validated Students by UIDAI, Invalid Students by UIDAI, Unprocessed Students , Aadhaar available Students, Aadhaar not available Students, Total Students याप्रमाणे विविध प्रकारची संख्यात्मक माहिती दिसेल.

स्टुडन्ट पोर्टल बाबत :
राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या (शासकीय, खाजगी) तसेच समाज कल्याण, आदिवासी विकास विभाग, अपंग आयुक्तालया मार्फत चालवल्या जात असलेल्या शाळा अशा शाळांमधून सुमारे २.२५ कोटी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

शालेय शिक्षण विभागामार्फत विद्यार्थी लाभाच्या विविध योजनांची अंमलबजावणी केली जाते. अंमलबजावणी करताना शाळास्तरावरून वारंवार माहिती घ्यावी लागते. ही माहिती तयार करून वरिष्ठ कार्यालयास पाठविण्यास शिक्षक, मुख्याध्यापक व प्रशासकीय यंत्रणा यांचा बरासचा वेळ खर्च होतो. त्यामध्ये वेळेची बचत होऊन सदर वेळ विद्यार्थ्याच्या गुणवत्ता वाढीसाठी उपलब्ध व्हावा यादृष्टीने विद्यार्थी माहिती प्रणाली विकसित करण्यात आली आहे.

तसेच सदर प्रणालीमुळे विद्यार्थी लाभाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करता येईल. या प्रणालीमुळे विद्यार्थी, शिक्षक, पालक, प्रशासकीय यंत्रणा इत्यादी सर्व घटकांना विद्यार्थ्याची माहिती एका क्लिक वर उपलब्ध होईल.

आपणा सर्वांना विद्यार्थी माहिती संकेत स्थळाचा चांगला उपयोग होईल असा विश्वास आहे.




Post a Comment

0 Comments

महाराष्ट्र मंत्रीमंडळ खाते वाटप जाहीर

LEARN EXCEL PAGE SETUP - 1