महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिनांक 2 जुलै 2024 रोजी शिष्यवृत्ती परीक्षा वर्ग पाचवी व वर्ग आठवी 2024 अंतिम निकाल अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केला आहे विद्यार्थ्यांना वैयक्तिक निकाल पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
वरील लिंक वर क्लिक केल्यानंतर पुढील प्रमाणे विंडो ओपन होईल त्यामध्ये आपला 11 अंकी बैठक क्रमांक परीक्षा प्रवेश पत्रावर असलेला (हॉल तिकीट) नोंदवा व सबमिट बटन वर क्लिक करा आपल्याला निकाल दिसेल
शाळेचा एकत्रित निकाल पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
लिंक वर क्लिक केल्यानंतर पुढील प्रमाणे विंडो ओपन होईल त्यामध्ये शाळेचा लॉगिन आयडी व पासवर्ड टाका सबमिट बटन वर क्लिक करा शाळा लॉगिन झाल्यानंतर आपल्याला संपूर्ण शाळेचा निकाल पाहता येईल.
जिल्हा निहाय तालुक्यांची गुणवत्ता यादी पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी लिंक.
• अंतिम निकाल प्राप्त करणे-
सदर परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यास अंतिम निकाल परिषदेच्या www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर वैयक्तिकरित्या स्वतःचा बैटक क्रांक टाकून पाहता येईल तसेच शाळेस त्यांच्या लॉगीनमध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा निकाल एकत्रितपणे पाहता येईल, तथापि शिष्यवृत्तीधारक झालेल्या विद्यार्थ्यांचे गुणपत्रक त्याच्या बैंक खात्याची व आधार क्रमांकाची माहिती भरल्याशिवाय पाहता डाऊनलोड करता येणार नाही. परंतु संकेतस्थळावरील गुणवत्ता यादीत त्याला स्वतःचा शिष्यवृत्ती संच प्रकार (अर्हता) पाहता येईल.
• संकेतस्थळावरील प्रसिध्द करण्यात आलेली शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची माहिती, तसेच इतर अनुषंगिक माहितीच्या Links खालीलप्रमाणे
1. अंतिम निकाल (विद्यार्थ्यांसाठी)
2. गुणवत्ता यादी (राज्यस्तरीय / जिल्हास्तरीय तालुकास्तरीय)
3. शाळा सांख्यिकीय माहिती (जिल्हानिहाय तालुकानिहाय)
विद्यार्थी, पालक, शाळा, क्षेत्रिय अधिकाऱ्यांना वरीलपैकी कोणत्याही हव्या असलेल्या लिंकवरक्लिक करून माहिती प्राप्त (DOWNLOAD) करून घेता येईल,
1. शासनमान्य मंजूर शिष्यवृत्ती संचांची संख्या मर्यादित असल्याने कटऑफ शेकडा गुणांइतके एकूण शेकडागुण मिळूनही प्रचलित निकषांची पूर्तता न करणारे विद्याथर्थी,
2. मान्यताप्राप्त नसलेल्या शाळांमधून (अनधिकृत शाळांमधून) परीक्षेस प्रविष्ठ झालेले विद्यार्थी.
3. विहीत कमाल वयोमर्यादेपेक्षा अधिक वयाचे विद्यार्थी.
4. परीक्षेतील गैरप्रकारात समाविष्ट विद्यार्थी.
5. आवेदनपत्र न भरता परीक्षेस ऐनवेळी प्रविष्ठ झालेल्या विद्याथ्यर्थ्यांपैकी शुल्क न भरलेले विद्यार्थी.
• गुणपत्रक / प्रमाणपत्राबाबत -
परिषदेने संकेतस्थळावर अंतरिम (तात्पुरते) गुणपत्रक दि. 30 एप्रिल, 2024 रोजी व अंतिम गुणपत्रक दि. 02 जुलै, 2024 रोजी उपलब्ध करून दिलेली आहे. छापील गुणपत्रक व प्रमाणपत्र यथावकाश शाळांना पोहोच करण्यात येतील.
• महत्त्वाचे
1. सन 2017-18 या शैक्षणिक वर्षापासून रद्द झालेल्या प्रश्नांचे गुण कमी करून उर्वरित अचूक प्रश्नांच्या एकूण प्राप्त गुणांवरून शेकडा गुण काढण्यात येतात. सदर एकूण शेकडा गुणांवरून गुणवत्ता याद्या निश्चित करण्यात आलेल्या आहेत.
2. ऑनलाईन आवेदनपत्रात चुकीची खोटी माहिती भरून शिष्यवृत्ती अर्हता प्राप्त झाल्याचे निदर्शनास आल्यास अशा शाळा प्रमुखांविरूध्द शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित केली जाईल. तसेच अशा विद्यार्थ्यांची अर्हता रद्द केली जाईल.
3. शिष्यवृत्ती रक्कम प्रदान करण्याबाबत मा. शिक्षण संचालक (योजना), महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडे गुणवत्ता यादीतील संबंधित विद्यार्थ्यांची शिफारस करण्यात येत आहे. शिष्यवृत्ती रकमेवावतचा यापुढील पत्रव्यवहार त्यांचे कार्यालयाकडेच करण्यात यावा, सुलभ संदर्भासाठी पत्ता
खालीलप्रमाणे
मा. शिक्षण संचालक (योजना)
शिक्षण संचालनालय योजना,
17 डॉ. आंबेडकर रोड, पुणे - 411 001.
फोन - 020-26126726
ईमेल - directorscheme.mh@gmail.com
हे प्रसिध्दीपत्रक परिषदेच्या www.mscepune.in व https://www.mscepuppss.in संकेतस्थळावरही उपलब्ध करून देण्यात येत आहे.
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS