इ व उ चे वाकप्रचार
इंगा जिरणे - गर्व नाहीसे होणे, खोड मोडणे.
इंगा दाखविणे - धाक बसविणे, जरब बसविणे.
इकडचा डोंगर तिकडे करणे - फार मोठे कार्य पार पाडणे.
इरेला पेटणे - इर्षेने खेळू लागणे.
इशारा देणे - सावधगिरीची सूचना देणे.
इन्कार करणे - नकार देणे.
इरेस पडणे - एखादी गोष्ट करण्याची जिद्द असणे.
इतिश्री करणे - शेवट करणे.
इमानास जागणे - इमान कायम ठेवणे.
इकडचे तोंड तिकडे करून टाकणे - अतिशय जोराने थोबाडात मारणे.
इंगळ्या डसणे - मनाला झोंबणे, वेदना होणे.
इहलोक सोडणे - मरणे.
इनमीन साडेतीन - थोडेसे, नगण्य.
उ चे वाकप्रचार
उकळी फुटणे - खूप आनंद होणे.
उखळ पांढरे होणे - खूप द्रव्य मिळणे.
उखाळ्या पाखाळ्या काढणे - एकमेकांचे उणेदुणे काढणे.
उघडा पडणे - खरे स्वरूप प्रकट होणे.
उचल खाणे - एखादी गोष्ट करण्याची अनिवार इच्छा होणे.
उचल बांगडी करणे - जबरदस्तीने हलविणे.
उच्चाटन करणे - घालवून देणे, नष्ट करणे.
उच्छाद मांडणे - उपद्रव देणे.
उचंबळून येणे - भावना तीव्र होणे.
उजाड माळरान - ओसाड जमीन.
उजेड पडणे - मोठे कृत्य करणे.
उल्लेख करणे - उच्चार करणे, सांगणे.
उंटावरून शेळ्या हाकणे - मनापासून काम न करणे.
उठून दिसणे - शोभून दिसणे, नजरेत भरणे.
उत्तेजन देणे - पाठिंबा देणे.
उतराई होणे - उपकार फेडणे.
उत्तीर्ण होणे - यशस्वी होणे.
उत्कंठा असणे - उत्सुक असणे.
उदक सोडणे - त्याग करणे.
उदरी शनी येणे - संपत्तीचा लाभ होणे.
उदास वाटणे - फार खिन्न वाटणे
उद्धार करणे - प्रगती करणे.
उधाण येणे - चेव येणे, ओसंडून वाहणे, भरती येणे.
उध्वस्त होणे - नाश पावणे.
उधळून देणे - पसरून देणे.
उन्मळून पडणे - मुळासकट कोसळून पडणे.
उन्हाची लाही फुटणे (उन्हाचा जाळ पेटणे) - अतिशय कडक ऊन पडणे.
उद्योगात चूर होणे - कामात गुंग असणे, मग्न
आपणांस हे ही आवडेल
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS