आज 15 ऑक्टोबर . ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती ! ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन ! आजच्या सुवर्णदिनापासून "जगातील किमयागार" हि आपल्या संशोधनाने जगात बदल घडवून आणणाऱ्या संशोधकाविषयी लेखमाला ! हि लेखमाला इयत्ता १ ली ते १२ वी च्या सर्व विद्यार्थ्यासाठी अत्यंत उपयुक्त होईल . विद्यार्थी विविध संशोधकांच्या आत्मचरित्र विषयी माहिती वाचतील व त्यांच्या विचारला चालना मिळेल हा उद्देश ! आपण सर्वाना नक्कीच आवडेल
" एका शहाण्या माणसाचा तर्कसंगत विचार हजारोंच्या हुल्लडबाजीहुन अधिक महत्त्वाचा आहे. - गॅलिलिओ गॅलिली " "In questions of science , the authority of thousands is not worth the humble reasoning of a single individual."
गॅलिलिओ गॅलिली यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1565रोजी इटली देशातील पिसा याठिकाणी झाला. गेली यांनी अनेक शोध लावले. " ईश्वराची भाषा गणित आहे, असे गॅलेलियो म्हणायचे."
गॅलिलिओ जगात प्रसिद्ध झाले ते त्यांनी बनवलेल्या दुर्बिणी साठी !सूर्यमालेतील गुरू ग्रहाला चार मोठे चंद्र आहेत हे गॅलिलिओने प्रथम पाहिले आणि हे चंद्र गुरू भोवती प्रदक्षिणा करतात हा त्यांनी शोध लावला. त्याचबरोबर सूर्यावरचे डाग आणि शुक्राच्या कला पाहणारा गॅलिलिओ हा पहिला मानव ! ज्यांनी या निरीक्षणातून " पृथ्वी व इतर ग्रह सूर्याभोवती फिरतात " या मताला भक्कम आधार मिळाला. गॅलिलिओ यांनी एकूण दोनशे दुर्बिणी बनवल्या . या सर्व दुर्बिणी शैक्षणिक संस्थांना प्रयोगासाठी दिल्या. शिवाय त्यांनी आपला ग्रंथ इटालियन भाषेत लिहिला. यामुळे त्यांना बलाढ्य अशा चर्चा रोष पत्करावा लागला व कारावासही भोगावा लागला.
" लंबकाच्या एका आंदोलनाला लागणारा वेळ केव्हा लंबकाच्या लांबीवर अवलंबून असतो",असा शोधही लावला. त्याचबरोबर "उंचीवरून सोडलेल्या कोणत्याही वस्तूचे त्वरण ( हवेचा विरोध सोडल्यास) एकच असते . " " सपाट आणि आदर्श गुळगुळीत पृष्ठभागावरून वाहणाऱ्या फरक होत नाही ", हे शोध त्यांनी लावलेले आहेत.
" प्रयोगांनी सिद्ध होईल तेच खरे " हा विचार जगामध्ये रुजवण्यात महत्त्वाची भूमिका निभावलेली आहे . वैज्ञानिक दृष्टीवर त्यांचा पूर्ण विश्वास होता . या सर्व शोधामुळे गॅलेलियो यांना ' आधुनिक विज्ञानाचा जनक ' असे म्हटले जाते
अशा महान संशोधकाला श्रद्धांजली म्हणून त्यांच्या 420 जयंती दिवशी आंतरराष्ट्रीय खगोल वर्ष म्हणून 2009 ला साजरे केले गेले. या या महान वैज्ञानिकचा मृत्यू 8 जानेवारी 1642 ला इटली या देशात झाला
✪ ✪ लेखक✤ ✤
⭐ श्री . लक्ष्मण विठ्ठल ननवरे ⭐ उपक्रमशील शिक्षक , जि . प.शाळा वेवजी सिगलपाडा केंद्र - वेवजी तालुका - तलासरी जि - पालघर
5 Comments
Nice
ReplyDeleteछान उपक्रम
ReplyDeleteNice sir 👌👌
ReplyDeleteछान माहिती.👍
ReplyDeleteखुप छान उपक्रम, थोडक्यात पण महत्वाची माहीती.
ReplyDeleteतुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS