Header Ads Widget

जगातील किमयागार - सर विल्यम हार्वे - SIR WILLIAM HARVEY

जगातील किमयागार - 2

सर विल्यम हार्वे - SIR WILLIAM HARVEY



सर विल्यम हार्वे - SIR WILLIAM HARVEY

 

या लेखमालेचा आजचा हा दुसरा भाग आपल्यापर्यंत ! जगातील किमयागार भाग दोन मध्ये आज आपण ओळख करून घेणार आहोत रक्ताभिसरण प्रक्रियेचा शोध ज्याने लावला, त्या संशोधकाविषयी ज्याचे नाव आहे सर विल्यम हार्वे !

सर विल्यम हार्वे यांचा जन्म 1 एप्रिल 1578 रोजी इंग्लंड या देशात झाला. सर विल्यम हार्वे ए प्रसिद्ध वैद्यक शास्त्रज्ञ आहे.

आपल्याला माहिती आहे की, प्रथम झाल्यास जखमेतून लाल रंगाचा पदार्थ बाहेर येतो, त्याला आपण रक्त म्हणतो. मात्र रक्त शरीरात नेमके कसे तयार होते, कुठे तयार होते,  कुठून कुठे वाहते, वेगवेगळ्या अवयवांना रक्त कसे   पोहोचते या सर्व प्रश्नांची उत्तरे आपणास  माहिती करून घेणे नक्कीच आवडेल. या सर्व प्रश्नांची उत्तरे सर विल्यम हार्वे या ब्रिटिश वैद्यक शास्त्रज्ञाने विविध प्रयोग करून शोधून काढली. 1628 साली विल्यम हार्वे यांनी रक्क्ताभिसरणाचा सुप्रसिद्ध सिद्धांत प्रसिद्ध केला.

शरीरात विविध रक्तवाहिन्यांच्या साह्याने रक्त वाहते. रक्त पुरवठा चे काम दोन भागांमध्ये चालते. सर्वात प्रथम रक्त हृदयापासून  फुफ्फुसात  जाते.याठिकाणी रक्त शुद्धीकरण करण्याचे काम केले जाते. रक्त शुद्ध झाल्यानंतर पुन्हा हृदयामध्ये येते.हृदयातून विविध रक्तवाहिन्यांतून शरीराच्या इतर सर्व अवयवांपर्यंत रक्त पोचविण्याचे काम केले जाते.

  हार्वे यांचा शोध अत्यंत अतुलनीय व वैद्यक शास्त्रामध्ये खूप महत्वाचा मानला गेला कारण या शोधामुळे वेगवेगळ्या रक्तवाहिन्या, त्यांचे आजार, रक्ताभिसरण प्रक्रियेत अडथळे निर्माण झाल्यास होणारे आजार या सर्व कारणांचा, समस्यांचा शोध घेणे शक्य झाले.या शोधासाठी वर्ष 1957 मध्ये सोव्हिएतने सर विल्यम हार्वे यांच्या नावाने टपाल तिकीट प्रसिद्ध केले.

 अशा महान वैद्यक शास्त्रज्ञाचा मृत्यू 3 जून 1657  रोजी झाला.अशा महान  अभिवादन !!!! 

William Harvey on a 1957 Soviet postage stamp

          

     ⭐ श्री . लक्ष्मण विठ्ठल ननवरे                                                                                                       उपक्रमशील शिक्षक ,
                   जि . प.शाळा वेवजी सिगलपाडा 
        केंद्र - वेवजी तालुका - तलासरी जि - पालघर  


Post a Comment

0 Comments

व्हिडीओ निर्मिती स्पर्धा 2023 निकाल लिंक

LEARN EXCEL PAGE SETUP - 1