जगातील किमयागार 3
सर आयझॅक न्यूटन
जगातील किमयागार या लेखमालेतील आजच्या भागामध्ये सर आयझॅक न्यूटन यांच्या विषयीची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
सर आयझॅक न्यूटन यांचा जन्म 25 डिसेंबर 1642 ला इंग्लंड या देशात झाला.
सर आयझॅक न्यूटन यांना भौतिकशास्त्रज्ञ गणितज्ञ व तत्वज्ञ म्हणून ओळखले जाते.
"कोणत्याही दोन वस्तू एकमेकांना आपल्याकडे खेचतात", असा सिद्धांत मांडला. या सिद्धांतानुसार झाडाचे फळ खाली का पडते, उंच चेंडू परत जमिनीकडे का येतो, ग्रह आणि उपग्रह यांच्या गती' अशा कितीतरी जटिल व कूट प्रश्नांचा उलगडा करण्यात सर आयझॅक न्यूटन यांना यश मिळाले . सर आयझॅक न्यूटन यांनी आपले सर्व सिद्धांत गणितीय समीकरणाच्या रूपात मांडले, हे त्यांचे एक अतिशय महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. गणितीय समीकरणाच्या स्वरूपात सिद्धांत मांडल्यामुळे अचूक उत्तरे मिळू लागली व त्याच्या साह्याने वेगवेगळे भाकिते, अंदाज वर्तवता येऊ लागले तसेच त्याची पडताळणी देखील करता येऊ लागली.
आपल्याला नेहमीच मिळणारा सूर्यप्रकाश हा जरी सफेद रंगाचा वाटला तरी तो सात रंगानी बनलेला असतो, असा शोध सर आयझॅक न्यूटन यांनी लावला गुरुत्वाकर्षणाच्या संदर्भात न्यूटन यांनी अतिशय महत्वाचा सिद्धांत मांडलेला आहे. त्याचबरोबर भौतिकशास्त्राच्या आणि गणिताच्या कित्येक शाखांमध्ये त्यांनी त्यांच्या संशोधनाने भर घातली आहे. सर आयझॅक न्यूटन यांनी गतिविषयक तीन नियम मांडले. त्यांना गती शास्त्राचे जनक असे सुद्धा म्हणता येईल. आजचे कित्येक शोध भौतिकशास्त्र आणि अभियांत्रिकी न्यूटन यांच्या सिद्धांतावर अवलंबून आहे.
न्यूटनचे गतीविषयक नियम :
पहिला नियम :
‘जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरल रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते’. यालाच ‘जडत्वाचा नियम’ असे म्हणतात.
उदा. बस अचानक सुरू होते तेव्हा प्रवाशांना मागच्या दिशेला धक्का बसतो.
दूसरा नियम :
‘संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समाणूपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते’.
उदा. गच्चीवरून समान आकाराचे बॉल खाली टाकणे.
संवेग –
वस्तूमध्ये सामावलेली एकूण गती म्हणजे संवेग होय.
p=mv
संवेग परिवर्तनाचा दर = संवेगात होणारा बदल / वेळ
mv-mu/t
m(v-u)/t
तिसरा नियम :
‘प्रत्येक क्रिया बलास समान परिमानाचे एकाच वेळी घडणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते व त्याच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात’.
उदा. जेव्हा बंदुकीतून गोळी मारली जाते तेव्हा बंदूक गोळीवर बल प्रयुक्त करते आणि त्यामुळे गोळीला अधिक वेग प्राप्त होतो.
अशी गतिविषयक तीन नियम मांडले. त्याच बरोबर भौतिकशास्त्र ला आवश्यक असलेल्या गणिताचा विकास व संशोधन शोधून काढण्याचे काम पूर्ण केलं. कॅल्क्युलस ही गणितातील अत्यंत महत्त्वाची शाखा सर आयझॅक न्यूटन यांनी शोधून काढली. त्याचबरोबर बायनॉमियल थेरम हेसुद्धा त्यांनी शोधून काढले. शोध आणि शोधांना लागणारे साधने या दोघांची निर्मिती करणारा एकमेव शास्त्रज्ञ गणितज्ञ !
"माझ्या आधीच्या शास्त्रज्ञ यांच्या खांद्यावर उभे राहिल्यामुळे मला थोडेसे पुढचे दिसले असेल ! "
अशा महान भौतिकशास्त्रज्ञ, गणीतज्ञा चा मृत्यू 31 मार्च 1727 रोजी वयाच्या 84 व्या वर्षी झाला.
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS