Header Ads Widget

नोबेल पुरस्काराचे जनक - ALFRED B NOBEL - आल्फ्रेड नोबेल - जगातील किमयागार भाग 5

जन्म : 1833                                   मृत्य : 1896



आल्फ्रेड नोबेलचा जन्म २१ ऑक्टोबर  १८३३ रोजी स्वीडनमधील स्टॉकहोम येथे झाला. नोबेलचे वडील औषधांचे उद्योजक होते व आल्फ्रेडने स्वतः शालेय शिक्षण खाजगी शिक्षकांकडून घेतले. यांत्रिकी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले असले तरी आल्फ्रेडला रासायनिक संशोधनात रस होता. भरीस वडील बंधुचा स्फोटकांच्या अपघातात मृत्यू ओढवल्यावर आल्फ्रेडने स्वतःला सुरक्षित स्फोटके शोधण्यासाठीच्या संशोधनाला वाहून घेतले व पुढे डायनामायटाचा शोध लावला.

डायनामायटामुळे नागरी तसेच लष्करी बांधकामे करणे सोपे झाले व नोबेलने प्रचंड संपत्ती मिळवली. आपल्या शोधाचा उपयोग युद्धातच जास्त होत असल्याचे व त्यामुळे आपण स्वतः इतरांच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचे शल्य नोबेलच्या मनाला सलत होते. त्याकारणाने आल्फ्रेड नोबेलने दहा लाख स्वीडिश क्रोनरांचे विश्वस्त मंडळ स्थापले व जगातील उत्तमोत्तम संशोधकांना व शांतिदूतांना त्यातून पारितोषिक देणे आरंभले. हे पारितोषिक म्हणजेच नोबेल पारितोषिक होय.

इ.स. १९५८ साली १०२ अणुक्रमांकाचे मूलद्रव्य प्रयोगशाळेत कृत्रिमरित्या बनवण्यात आले; तेव्हा त्याला नोबेल यांच्या स्मरणार्थ नोबेलियम असे नाव देण्यात आले.

नोबेल यांना लिजन ऑफ ऑनर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . 

                 डायनामायट

डायनामाइट हे नायट्रोग्लिसरीन , सॉर्बेंट्स (जसे की पावडरचे कवच किंवा चिकणमाती) आणि स्टेबिलायझर्सपासून बनविलेले स्फोटक आहे . स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ आणि अभियंता आल्फ्रेड नोबेल  यांनी याचा शोध लावला . 

अशा महान शास्त्रज्ञ चा मृत्यू 10 डिसेंबर 1896 ला झाला . भौतिक , रसायन , साहित्य चिकित्सा , अर्थशास्त्र आणि शांतता या क्षेत्रात उत्तम योगदान देणाऱ्या व्यक्तीला नोबेल पुरस्कार देण्यात येतो . 

                     नोबेल पारितोषिक

Post a Comment

1 Comments

तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS

व्हिडीओ निर्मिती स्पर्धा 2023 निकाल लिंक

LEARN EXCEL PAGE SETUP - 1