जगातील किमयागार - अलेक्झांडर फ्लेमिंग
ALEXANDER FLEMING
अलेक्झांडर फ्लेमिंग यांचा जन्म 06 ऑगस्ट 1881 दक्षिण-पश्चिम स्कॉटलंडमध्ये येथे झाला. कॉलरा मलेरिया कोरोना प्लेग यासारखे महाभयंकर आजार रोगजंतू मुळेच होतात हे सर्वांना माहिती होते अशा महाभयंकर रोगांची साथ आली की हानी खूप होते साथ पसरते . अशा रोगांना आळा कसा घालायचा हा खूप मोठा प्रश्न मनुष्य जातीला शास्त्रज्ञांना सतावत होता आणि याच प्रश्नाचे उत्तर सर अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी दिले . प्रयोगशाळेत जंत वर प्रयोग करत असताना त्यांना एक निरीक्षण जाणवले ज्या बशी मध्ये एक प्रकारच्या बुरशीची वाढ झाली होती , त्या बशीमध्ये इतर सूक्ष्मजंतूंची वाढ थांबली होती. ते अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी या बुरशीतील काही रासायनिक द्रव्यांचा वापर सूक्ष्म जंतू मारण्यासाठी होऊ शकतो हे सिद्ध केले आणि त्यांनी याला पेनिसिलीन असे नाव दिले अशा रीतीने पेनिसिलीन हे पहिले अँटिबायोटिक जन्माला आले पेनिसिलीन मुळे अवघड व जीवघेण्या रोगामुळे मृत्युमुखी, तळमळत पडलेल्या रोग्यांना जणू नवजीवन मिळाले !
पेनिसिलीनचा शोध लागल्यानंतर सुरुवातीची काही वर्ष पेनिसिलीन औषध म्हणून वापरण्यास सुरक्षित नव्हते. फ्लेमिंग व त्यांचे सहकारी चेन व फ्लोरी यांनी खूप मेहनत केली. त्या बुरशीपासून शुद्ध स्वरूपात औषध म्हणून वापरता येईल असे पेनिसिलिन तयार केले . त्यांच्या या शोधाबद्दल अलेक्झांडर फ्लेमिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांना 1945 चे नोबेल पारितोषिक देण्यात आले. अशा महान वैज्ञानिक आचा मृत्यू 11 मार्च 1955 लंडन येथे झाला.
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS