Header Ads Widget

मानसिक क्षमता चाचणी - NAVODAYA VIDYALAYA TEST

 मानसिक क्षमता चाचणी 


online क्लासला जॉईन होण्यासाठी 👇👇👇👇

                  स्मार्ट किड्स नवोदय क्लासेस

 (1) गटातील वेगळी आकृती ओळखणे यावरील माहिती 

विभाग 1 

मानसिक क्षमता चाचणी

(प्रश्न 1 ते 40 - एकूण 50 गुण)

विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन

    आकृत्या व चित्रे पाहून विचार करण्यामध्ये काहीच अडथळा नाही. यातून सर्वच विद्यार्थ्यांची मानसिक क्षमता मोजता येणे शक्य होते. यासाठीच 'मानसिक क्षमता चाचणी' या विषयात फक्त आकृत्या व चित्रे या स्वरुपांतील प्रश्न विचारले जातात.

online क्लासला जॉईन होण्यासाठी 👇👇👇👇

                  स्मार्ट किड्स नवोदय क्लासेस

या विभागातून एकूण 40 प्रश्न विचारले जातात, ज्यासाठी एकूण 50 गुण असतात. तसेच प्रत्येक भागातून 4 प्रश्न विचारले जातात.


'मानसिक क्षमता चाचणी' या प्रश्नपत्रिकेत पुढील दहा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. प्रश्नपत्रिकेत या प्रश्नप्रकारांचा क्रम वेगळा असू शकतो.


(1) गटातील वेगळी आकृती ओळखणे.

(2) हुबेहुब आकृती ठरवणे.

(3) चौरस आकृती पूर्ण करणे.

(4) आकृत्यांचा क्रम पूर्ण करणे.

(5) आकृत्यांमधील समान संबंध शोधणे.

(6) अपूर्ण आकृती पूर्ण करणे.

(7) आकृतीचे प्रतिबिंब शोधणे.

(8) दुमडून कापलेल्या कागदाची घडी उलगडणे.

(9) तुकडे जोडून बनणारी आकृती ओळखणे.

(10) लपलेली प्रश्नआकृती शोधणे.

                  💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢


(1) गटातील वेगळी आकृती ओळखणे.

माहिती :


या प्रश्न प्रकाराअंतर्गत विचारलेल्या प्रश्नांमध्ये चार चित्रे दिलेली असतात. या चित्रांमध्ये तीन चित्र कोणत्या तरी प्रकारे एकसमान असतात आणि एक चित्र त्या तीन चित्रांपेक्षा वेगळे असते. परीक्षार्थींना ते वेगळे चित्र निवडायचे असते.


परीक्षार्थींना समजण्याच्या दृष्टीने तसेच वेगळे चित्र ओळखण्यासाठी खालील प्रकार दिलेले आहेत, जे प्रश्न सोडविण्यासाठी उपयुक्त आहेत :-


(I) आकृत्यांचा आकार : या प्रश्नांअंतर्गत दिलेल्या प्रश्न आकृत्यांपैकी तीन विशेष आकारानुसार तयार केलेल्या असतात आणि एक आकृती वेगळी असते. ही वेगळी आकृती म्हणजेच उत्तर आहे.


(ii) आकृत्यांमधील रेषांची संख्या : या प्रश्न प्रकाराअंतर्गत विचारलेल्या प्रश्नांमध्ये चार चित्रे दिलेली असतात. या चित्रांमध्ये तीन चित्रांमधील रेषांची संख्या समान असते आणि उरलेल्या एका चित्रामध्ये रेषांची संख्या कमी किंवा जास्त असते. परीक्षार्थीने निवडलेले हे वेगळे चित्र म्हणजेच त्या प्रश्नाचे उत्तर होय.


(iii) आकृत्यांची स्थिती : या प्रश्न प्रकाराअंतर्गत विचारलेल्या प्रश्नांमध्ये चार चित्रे दिलेली असतात. या चित्रांमधील तीन चित्रांची स्थिती एकसारखी असते आणि एकाची स्थिती या तिन्हींपेक्षा वेगळी असते. परीक्षार्थीने निवडलेले हे वेगळे चित्र म्हणजेच त्या प्रश्नाचे उत्तर होय.

online क्लासला जॉईन होण्यासाठी 👇👇👇👇

                  स्मार्ट किड्स नवोदय क्लासेस

(iv) मुख्य बाहेरील आकृती आणि आतील आकृत्यांमध्ये संबंध : या प्रश्न प्रकाराअंतर्गत एका मुख्य बाहेरील चित्राच्या आत कधी कधी एकापेक्षा जास्त आकृत्या असतात, ज्या परस्पर एक-दुस-यांशी कोणत्या तरी प्रकारे संबंधीत असतात. हा संबंध बाजूंची वाढ किंवा बाजूंची संख्या कमी होणे यावर आधारित असतात.


(v) डिझाईनची संख्या : या प्रश्न प्रकाराअंतर्गत विचारलेल्या प्रश्नांमध्ये चार चित्रे दिलेली असतात. यातील तीन चित्रांमधील डिझाईनची संख्या सारखी असते आणि एकातील डिझाईनची संख्या वेगळी असते. परीक्षार्थीने निवडलेले हे वेगळे चित्र म्हणजेच त्या प्रश्नाचे उत्तर होय.


(vi) आकृत्यांचे फिरणे : या प्रश्न प्रकाराअंतर्गत विचारलेल्या प्रश्नांमध्ये चार चित्रे दिलेली असतात. यातील तीन चित्र घड्याळाच्या काट्याच्या दिशेने किंवा घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने व एक चित्र याउलट क्रिया करीत असेल, तर परीक्षार्थीने निवडलेले हे वेगळे चित्र म्हणजेच त्या प्रश्नाचे उत्तर होय.


(vii) पॅटर्नमध्ये समानता : या प्रश्न प्रकाराअंतर्गत विचारलेल्या प्रश्नांमध्ये चार चित्रे दिलेली असतात. यातील तीन चित्रांमध्ये एकसारखा पॅटर्न असतो व उरलेल्या एका चित्रात हा पॅटर्न नसतो. परीक्षार्थीने निवडलेले हे वेगळे चित्र म्हणजेच त्या प्रश्नाचे उत्तर होय.

online क्लासला जॉईन होण्यासाठी 👇👇👇👇

                  स्मार्ट किड्स नवोदय क्लासेस

(viii) लिखाणाची पद्धत : या प्रश्न प्रकाराअंतर्गत एखादा अंक किंवा इंग्रजी अक्षर एक चित्र समजले जाते. अंक किंवा इंग्रजी अक्षरांना रेषांची संख्या, लिहिण्याची पद्धत, खुली किंवा बंद आकृती यावर आधारित वर्गीकरण केले जाते.


(ix) अस्तित्वात असणा-या चित्रांवर आधारित : या प्रश्न प्रकाराअंतर्गत विचारलेल्या प्रश्नांमध्ये चार चित्रे दिलेली असतात, ज्यातील तीन चित्रांमधून एकसारखा अर्थ निघतो आणि एक चित्राचा त्या तिन्ही चित्रांच्या अर्थाशी संबंध नसतो. हे वेगळे चित्र म्हणजेच त्या प्रश्नाचे उत्तर होय.


(x) अर्थपूर्ण शब्दांवर आधारित : या प्रश्न प्रकाराअंतर्गत विचारलेल्या प्रश्नांमध्ये चित्रांच्या रुपामध्ये चार शब्द दिलेले असतात, ज्यातील तीन शब्द अर्थाच्या दृष्टीने एकसारखे असतात व एका शब्दातून वेगळा अर्थ निघतो. हा वेगळ्या अर्थाचा शब्द म्हणजेच त्या प्रश्नाचे उत्तर होय.

online क्लासला जॉईन होण्यासाठी 👇👇👇👇

                  स्मार्ट किड्स नवोदय क्लासेस

NOTE : मागील काही वर्षांपासून अर्थपूर्ण शब्दांवर आधारित प्रश्न परीक्षेत विचारले जात नाहीत.




Post a Comment

0 Comments

व्हिडीओ निर्मिती स्पर्धा 2023 निकाल लिंक

LEARN EXCEL PAGE SETUP - 1