Header Ads Widget

HOW TO WITHDRAW P.F . IN ADVANCE OR PARTIAL MONEY ONLINE ? KNOW COMPLETE PROCESS ..... कसा काढायचा आगाऊ ऑनलाइन पी.फ.? संपूर्ण माहिती जाणून घ्या

HOW TO WITHDRAW P.F . IN ADVANCE OR PARTIAL MONEY ONLINE ? KNOW COMPLETE PROCESS ..... कसा काढायचा आगाऊ ऑनलाइन पी.फ.? संपूर्ण माहिती जाणून 
घ्या 
जर आपण कर्मचारी असाल आणि तुमच्या वेतनातून दरमहा p. F / EPF कपात केला जात असेल तर हा लेख आपल्या साठी अत्यंत महत्त्वाचा आहे . कारण या लेखात आपण p f ची रक्कम ऑनलाईन कशी काढायची , याविषयी सविस्तर माहिती घेऊया . 
काही विशिष्ट परिस्थितीमध्ये  आपण आपल्या PF मधून पैसे काढू शकतो. चला तर मग पाहूया 
PF मधून पैशे काढण्याची प्रक्रिया सोपी व्हावी , वेळ वाचवा यासाठी EPFO  ने ऑनलाईन सुविधा सुरू केली आहे .  या पोर्टलवरील सुविधांचा वापर करण्यापूर्वी काही गोष्टींची पूर्तता केलेली असणे गरजेचे आहे 
1) तुमचे UAN खाते सक्रिय म्हणजे ACTIVE आहे की नाही हे पाहावे . जर ACTIVE नसेल तर तो ऍक्टिव्ह करून घ्यावा .
2) आपले खाते आधार , पॅन व इतर तपशिलासह , IFSC CODE शी जोडलेले असणे आवश्यक आहे. 
चला तर मग पाहूया ऑनलाईन अर्ज कसा करावा ...
1 ) प्रथम आपणाला खाली दिलेल्या EPFO पोर्टल जावे लागेल.
2) पुढे आपणाला आपला UAN क्रमांक , तुमचा पासवर्ड व KAPTCHA कॅपचा कोड टाकायचा आहे . लॉगिन करावे 
3) त्यानंतर MANAGE /  मॅनेज या टॅबमधील KYC  या पर्यायावर जावे . तुमचा आधार , पॅन , बँक माहिती व इतर माहिती अचूक आहे की नाही याची खात्री  करून घ्यावी . 

4) KYC  माहितीची खात्री केल्यानंतर आपणाला ONLINE SERVICES या टॅब वर जायचे आहे . त्यातील क्लेम या पर्यायावर क्लीक करावे . 



5) आता तुमच्या पेजवर सदस्य तपशील, KYC माहिती व सेवा तपशील दिसेल .
6) या नंतर क्लेम फॉर्म भरण्यासाठी " PROCEED FOR ONLINE CLAIM" या टॅब वरती क्लीक करा.
7) क्लेम फॉर्म मध्ये " I WANT TO APPLY FOR ......"  या ठिकाणी पूर्ण EPF सेटलमेंट, EPF पार्ट विथड्रॉल कर्ज / आगाऊ किंवा पेन्शन विथड्रॉल असे पर्याय दिसतील . योग्य तो पर्याय निवडावा . सेवेच्या निकषामुळे जर आपण पेन्शन काढण्यास अपात्र असाल तर हे पर्याय आपणांस दिसणार नाहीत , याची नोंद घ्यावी.
   आशा प्रकारे आपण आपला अर्ज करायचा आहे तो ही ऑनलाईन बरं का ! 
ही माहिती आवडली असेल , तुमच्या फायद्याची असेल तर share , follow करायला विसरू नका 

दुसऱ्या भागात नक्की वाचाच  

कोणकोणत्या कारणास्तव आपण P F काढू शकतो ?  त्याचे निकष कोणते ? किती रक्कम काढता येऊ शकते ? याची सविस्तर माहिती 

Post a Comment

0 Comments

व्हिडीओ निर्मिती स्पर्धा 2023 निकाल लिंक

LEARN EXCEL PAGE SETUP - 1