Header Ads Widget

अंक गणित - विभाग दोन जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा माहिती छोटी छोटी , लेकीन महत्त्वपूर्ण बातें

अंक गणित - विभाग दोन जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा माहिती छोटी छोटी , लेकीन महत्त्वपूर्ण बातें 

        जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत गणित या विषयावर एकूण वीस प्रश्न विचारले जातात . त्यांना एकूण 25 गुण असतात . प्रत्येक प्रश्न सोडवावा लागतो प्रत्येक अचूक उत्तरासाठी 1.25 गुण दिला जाईल .
विद्यार्थ्यांची अंक गणीताची मुलभूत कौशल्य आणि प्राविण्य अजमावणे, हा अंक गणित विभाग दोनचा मुख्य उद्देश असतो .
विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेत कच्च्या कामासाठी दिलेल्या जागेतच आकडेमोड अगर कच्चे काम करावे 
उत्तर पत्रिकेत फक्त आंतरराष्ट्रीय आकड्यांचाच उपयोग करायचा असतो उदा . 1 , 2 ,3,4,.......
प्रत्येक प्रश्नासाठी ए बी सी डी अशी चार पर्याय असलेले उत्तर दिलेले असतात चार पर्याय पैकी एकच उत्तर अचूक असते अचूक उत्तर शोधून त्याच्याशी संगत अक्षर दर्शवणारे वर्तुळ गडद करायचे असते
 जवाहर नवोदय परीक्षेच्या तीन विभागासाठी असलेल्या एकूण 220 मिनिटांपैकी 30 मिनिटांत अंक गणिताचा विभाग सोडवून पूर्ण होईल , याची दक्षता घ्यावी . 
आता आपण अंकगणित या विषयात कोणकोणत्या घटकांवर प्रश्न असतात ? 
या विषयावर खालील 15 घटकांवर प्रश्न विचारले जातात .
★ संख्या आणि संख्या पद्धती
★ पूर्ण संख्यावरील चार मूलभूत क्रिया 
★ अपूर्णांक व त्यावरील मूलभूत चार क्रिया 
★ अवयव व गुणक आणि त्यांचे गुणधर्म
★ संख्यांचे लसावी व मसावी
★ दशांश अपूर्णांक व त्यावरील मूलभूत क्रिया 
★ दशांश आणि व्यावहारिक अपूर्णांक एकमेकांत रूपांतर 
★ लांबी , वस्तुमान , धारकता, काल ,चलन , इत्यादी राशीचे मापन करण्यासाठी संख्यांचा उपयोग
★ अंतर , काळ आणि गती यांचे मापन
★ गणितीय सूत्रांचे अंदाजीकरण
★ गणितीय सूत्रांचे सरलीकरण
★ शतमान आणि त्यांचे उपयोग
★ नफा - तोटा 
★ सरळव्याज
★ परिमिती,क्षेत्रफळ आणि आकारमान म्हणजेच घनफळ 
या घटकवरील सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ असतात . या प्रश्नांची उत्तरे ज्ञान , स्मरणशक्ती , तोंडी गणिती क्रिया करणे याच्या आधाराने करणे आवश्यक आहे . गणितातील नियम , एकके यांचा सराव करावा . 
जवाहर नवोदय विद्यालय  प्रवेश परीक्षा बाबत EDUTECH ONLINE YOUTUBE CHANNEL
वर मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे . 
तरी आपण खालील लिंकवर क्लिक  करावे . याचा महराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना नक्की फायदा होईल .
👇👇👇👇👇👇👇

online क्लासला जॉईन होण्यासाठी 👇👇👇👇

                  स्मार्ट किड्स नवोदय क्लासेस

चला मग लागा तयारीला !



Post a Comment

0 Comments

महाराष्ट्र मंत्रीमंडळ खाते वाटप जाहीर

LEARN EXCEL PAGE SETUP - 1