WHAT IS KAPREKAR'S NUMBER ? कापरेकर संख्या म्हणजे काय ? याचा शोध कोणी लावला ?
गणित विषय म्हटलं की , संख्या व क्रिया , त्याचे गुणधर्म लगेच आपल्या डोळ्यासमोर येतात . Paytahgors,रामानुजन यासारख्या अनेक गणिततज्ज्ञनी वेगवेगळे शोध लावले . गणित विषय सुद्धा खूप मजेशीर विषय आहे . चला तर मग माहिती करूया 6174 या संख्येविषयी .सर्व अंक वेगवेगळे असलेली कोणतीही एक चार अंकी संख्या घ्याउदा . 8531 ही संख्या घेऊत्यासंख्येतील अंक उतरत्या क्रमाने लिहा . एक नवीन चार अंकी संख्या मिळेल .उदा . 8531 ही संख्या उतरत्या क्रमाने मांडुया . 8531 ही नवीन संख्या तयार होईलनव्या संख्येतील अंक चढत्या क्रमाने मांडा . नवीन चार अंकी संख्या मिळेल.उदा. 8531 ही संख्या चढत्या क्रमाने मांडू1358 ही संख्या मिळेल.या दोन नवीन संख्या पैकी मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. येणारी वजाबाकी चार अंकी संख्या असेल . वजाबाकी तीन अंकी संख्या आल्यास सहस्त्रस्थानी म्हणजेच हजार स्थानी 0 हा अंक लिहा
मोठी संख्या 8531लहान संख्या 1358वजाबाकी करा8531-1358.…............7173
वजाबाकी करून आलेल्या संख्येवर वरीलप्रमाणे क्रिया पुन्हा पुन्हा करा
7173 ही संख्या उतरत्या व चढत्या क्रमाने मांडुयाउतरता क्रम 7731चढता क्रम 1377यांची वजाबाकी करा6354 ही संख्या मिळेल
चढता क्रम 3456उतरता क्रम 6543वजाबाकी 30873087 ही संख्या मिळेल
चढता क्रम 3078उतरता क्रम 8730वजाबाकी 83528352 ही संख्या मिळेल
चढता क्रम 2358उतरता क्रम 8532वजाबाकी 6174
आशा प्रकारे काही वेळा क्रिया केल्यावर तुम्हांला 6174 ही संख्या मिळेल . या नंतर ही ही क्रिया केल्यास 6174 ही संख्या पुन्हा पुन्हा मिळेल .याचा शोध गणिततज्ज्ञ दत्तात्रय रामचंद्र कापरेकर यांनी लावला आहे . म्हणून 6174 या संख्येला कापरेकर संख्या म्हणतात
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS