Header Ads Widget

1 MAY - MAHARASHTRA DAY १ मे महाराष्ट्र दिवस महाराष्ट्र राज्याविषयी काही महत्वाची माहिती

  1 MAY - MAHARASHTRA DAY 

    १ मे महाराष्ट्र दिवस 

    १ मे १९६० रोजी महराष्ट्राची निर्मिती झाली . म्हणून आपण सर्व मराठी भाषिक आजचा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून आनंदाने साजरा करतो . महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात , सर्व सरकारी कार्यालये  या ठिकाणी झेंडावंदन केले जाते . विवध कार्यक्रम आयोजित केले जातात . महाराष्ट्र साठी ज्यांनी बलिदान दिले अशा सर्व महान व्यक्तींना आदरांजली अर्पण केली जाते . 

महाराष्ट्र दिनाच्या सर्वाना शुभेच्छा !

आजच्या दिवशी जाणून घेवूया महाराष्ट्र राज्याविषयी काही                   महत्वाची माहिती

                            महाराष्ट्र राज्याविषयी काही महत्वाची माहिती



  1. महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960
  2. राजधानी मुंबईराज्यभाषा मराठी.
  3. एकुण जिल्हे 36, एकुण तालुके 355, ग्रामपंचायत 28,813, पंचायत समित्या 355.
  4. एकुण जिल्हापरिषद 34.      
  5. विधानसभा आमदार 288 , विधानपरिषद आमदार 78, महा. लोकसभा सदस्य 48.
  6. लोकसंख्येच्या बाबतीत 2 रा क्रमांकक्षेत्रफळात 3 रा क्रमांक.
  7. देशातील 9.29: लोकसंख्या महाराष्ट्रात राहाते.
  8. महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या पुणे’ ( 94.3 लाख)
  9. महाराष्ट्रातील सर्वाधिक कमी लोकसंख्या सिंधुदुर्ग’ (8.50 लाख)
  10. महाराष्ट्रातील सर्वाधिक जंगले असलेला जिल्हा गडचिरोली.
  11. महाराष्ट्रातील कमी जंगल असलेला जिल्हा बीड.
  12. महाराष्ट्रातील अधिक तलावांचा जिल्हा गोंदिया.
  13. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर.
  14. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा मुंबई शहर.
  15. महाराष्ट्रातील उंच शिखर कळसुबाई 1646 मी.
  16. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी गोदावरी.
  17. महाराष्ट्रात सर्वात जास्त समुद्रकिनारा रत्नागिरी.
  18. जगातील पहिले जैव तंत्रज्ञान विद्यापीठ नागपुर.
  19. पहिला संपुर्ण डिजीटल जिल्हा नागपुर (ऑक्टोबर 2016)

                    महाराष्ट्रातील 6 प्रशासकीय विभाग:



  1. कोकण (30746 चौ.किमी): मुंबईमुंबई उपनगरठाणेपालघररायगडरत्नागिरी/सिंधुदुर्ग.
  2. पुणे/प.महाराष्ट्र (57268 चौ.किमी): पुणेसातारासांगलीसोलापूरकोल्हापूर.
  3. नाशिक/खान्देश (574426 चौ.किमी): नाशिकअहमदनगरधुळेजळगावनंदुरबार.
  4. औरंगाबाद/मराठवाडा (64822 चौ.किमी): औरंगाबादजालनाबीडपरभणीहिंगोलीउस्मानाबादलातूरनांदेड.
  5. अमरावती/प.विदर्भ (46090 चौ.किमी): अमरावतीबुलढाणाअकोलायवतमाळवाशिम.
  6. नागपूर/पूर्व.विदर्भ (51336 चौ.किमी): नागपूरवर्धाचंद्रपूरगडचिरोलीभंडारागोंदिया.

राजकीय सीमा व सरहद्द :

  1. वायव्येस : गुजरात व दादरा नगर हवेली.
  2. उत्तरेस : मध्यप्रदेश.
  3. पूर्वेस : छत्तीसगड.
  4. आग्नेयेस : आंध्र प्रदेश.
  5. दक्षिणेस : कर्नाटक व गोवा.

नैसर्गिक सीमा :

  1. वायव्येस : सातमाळा डोंगररांगा, गाळणा टेकड्या व सातपुडा  पर्वतातील अक्राणी टेकड्या.

  2. उत्तरेस : सातपुडा पर्वतरांगा व त्याचा पूर्वेस गाविलगड टेकड्या.
  3. ईशान्येस : दरेकासा टेकड्या.
  4. पूर्वेस : चिरोळी टेकड्या व भामरागड डोंगर.
  5. दक्षिणेस : हिरण्यकेशी नदी व कोकणातील तेरेखोल नदी.
  6. पश्चिमेस : अरबी समुद्र.

राज्य व त्यांना जोडणारे महाराष्ट्रातील जिल्हे :

  • गुजरात : पालघरनाशिकनंदुरबारधुळे
  • दादर नगर हवेली : पालघरनाशिक
  • मध्ये प्रदेश : नंदुरबारधुलेजळगावबुलढाणाअमरावतीनागपुरभंडारागोंदिया
  • छत्तीसगड : गोंदियागडचिरोली
  • आंध्रप्रदेश : गडचिरोलीचंद्रपुरयवतमाळनांदेड
  • गोवा : सिंधुदुर्ग

महाराष्ट्राचे भारतातील स्थान :

1) विस्तार

  • अक्षांक : 15° 41’ उत्तर अक्षवृत्त ते 22° 6’ उत्तर अक्षवृत्त.
  • रेखांश : 72° 36’ पूर्व रेखांश ते 80° 54’ पूर्व रेखावृत्त.

2) आकार

  • व्हीव्हीत्रिकोणाकृतीदक्षिणेस चिंचोळा तर उत्तरेस रुंद.
  • पाया – कोकणात व निमुळते टोक विदर्भात.

3) लांबीरुंदी व क्षेत्रफळ

  1. लांबी = पूर्व – पश्चिम – 800 किमी.
  2. रुंदी = दक्षिण – उत्तर – 720 किमी.
  3. क्षेत्रफळ = 307713 चौ.किमी.
  4. क्षेत्रफळाच्या द्रुष्टीने भारतात राजस्थानमध्यप्रदेश नंतर महाराष्ट्रचा 3 रा क्रमांक लागतो.
  5. महाराष्ट्राने देशाचा 9.36% भाग व्यापला आहे.
  6. समुद्रकिनारा 720 किमी. लांबीचा आहे.

जिल्हे निर्मिती :

  1. औरंगाबाद जिल्ह्यातून जालना जिल्हा वेगळा केला : १ मे १९८१
  2. उस्मानाबाद मधून लातूर वेगळा केला : १६ ऑगस्ट १९८२
  3. चंद्रपूर मधून गडचिरोली वेगळा केला : २६ ऑगस्ट १९८२
  4. बृहमुंबई जिल्ह्यातून मुंबई उपनगर जिल्हा वेगळा केला : ४ ऑक्टोंबर १९९०
  5. अकोला जिल्ह्यातून वाशीम वेगळा केला : १ जुलै १९९८
  6. धुळे जिल्ह्यातुन नंदुरबार वेगळा केला : १ जुलै १९९८
  7. परभणी जिल्ह्यातून हिंगोलीची निर्मिती केली : १ मे १९९९
  8. भंडारा जिल्ह्यातून गोंदियाची निर्मिती केली : १ मे १९९९
  9. परभणी जिल्ह्यातून हिंगोली निर्माण केला : १ मे १९९९
  10. ठाणे जिल्ह्यातून पालघर ची निर्मिती झाली : १ ऑगस्ट २०१४


Post a Comment

0 Comments

महाराष्ट्र मंत्रीमंडळ खाते वाटप जाहीर

LEARN EXCEL PAGE SETUP - 1