Header Ads Widget

जनधन खात्यातील शिल्लक तपासा मिस कॉल करून #जनधन योजना #balance

प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत, जर आपण जनधन खाते उघडले असेल तर फक्त एका मिस कॉलद्वारे आपण आपल्या खात्यातील शिल्लक तपासू शकता. या योजनेअंतर्गत ग्राहकांना अनेक सुविधा उपलब्ध आहेत. जन धन बँक खाते हे झिरो बॅलन्स बचत खाते आहे. तसेच, ओव्हरड्राफ्ट (Overdraft) आणि रूपे कार्ड (Rupay Card) यासह अनेक खास सुविधा यामध्ये उपलब्ध आहेत.

खालील दोन पद्धतीने आपण आपल्या जन धन खात्यातील शिल्लक घरबसल्या सहजपणे तपासू शकतो.

१) पहिली पद्धत आहे मिस कॉलद्वारे.

२) आणि दुसरी पध्दत, PFMS पोर्टलद्वारे.

खाली सविस्तर माहिती दिलेली आहे👇

◆ मिस कॉलद्वारे शिल्लक तपासण्यासाठी :- भारतीय स्टेट बँकेत आपले जनधन खाते असल्यास, 18004253800 किंवा 1800112211या क्रमांकावर मिस कॉल द्यावा. त्यासाठी आपला मोबाईल क्रमांक आपल्या बँक खात्याशी रजिस्टर्ड असणे आवश्यक आहे. रजिस्टर्ड मोबाईल नंबर वरून मिस कॉल केल्यावरच आपली शिल्लक आपल्याला कळू शकेल.

◆ PFMS पोर्टलद्वारे शिल्लक तपासण्यासाठी :-

सर्वप्रथम क्रोम ब्राऊजर वर जाऊन https://pfms.nic.in ही लिंक टाईप करा.
आता ‘Know Your Payment’ या पर्यायावर क्लिक करा.
त्यानंतर आपला खाते क्रमांक टाईप करा.
आता पुन्हा एकदा खाते क्रमांक रिटाईप करा.
त्यानंतर दिलेला कॅप्चा कोड जसाच्या तसा टाईप करा.
आता आपल्या खात्याची शिल्लक आपल्या समोर दिसेल. अशाप्रकारे अगदी सहजपणे आपण आपल्या जनधन खात्याची शिल्लक घरबसल्या तपासू शकता.

Post a Comment

0 Comments

व्हिडीओ निर्मिती स्पर्धा 2023 निकाल लिंक

LEARN EXCEL PAGE SETUP - 1