कणखर देशा राकट देशा दगडांच्याही देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा मराठी भाषण
मित्रहो आज आपल्या शिवाजी महाराजांची जयंती शिवजयंती म्हटलं की आपल्या आनंदाला पारावर नसतो सह्याद्रीच्या कड्याकपारानाही पाझर फुटेल डोंगर माथ्यानाही घाम फुटेल श्वास आणि झाडेझुडपे की शहरातील अशा हर हर महादेव या गगन ललकारी ने अवघ्या महाराष्ट्रातील शत्रूच्या उरात धडकी भरायची की गगनभेदी ललकारी ज्यांच्या धामधुमीत निनादत होती तो रयतेचा राजा मावळ्यांचा राजा बहुजनांचा राजा शेतकऱ्यांचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय
अवघ्या पंधराव्या वर्षी स्वतंत्र महाराष्ट्राचे स्वप्न उराशी बाळगत चार मावळ्यांच्या जोरावर स्वराज्याचे तोरण बांधणारा हा द्रष्टा राजा यावरून मला एक कविता म्हणाविशी वाटते
इतिहासाचे साक्षीदार,
उभे तुमच्यासमोर,
किल्ला एक एक न्ह्याहाळा,
आठवा शिवबांचा कारभार....
दिली उभारी मनाला,
झाले वार्या वरती स्वार
हर - हर महादेव गर्जले ते,
चार मावळ्यांच्या जोरावर..
अवघ्या मूठभर सैन्यांना घेऊन ज्यांनी आभाळभर शौर्य गाजवले!मराठी भाषण
आपल्या चतुर आणि चाणाक्ष बुद्धीने गनिमीकावा खेळ भल्याभल्या शत्रुंना पाणी पाजले ते राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज!
शिवनेरी किल्ल्यावर दिनांक 19 फेब्रुवारी 1630 रोजी एक तेजस्वी सूर्य जन्माला आला आणि सुमारे साडेतीनशे वर्ष अंधारात चाचपडणाऱ्या महाराष्ट्राच्या माथ्यावर जणू प्रकाशाचे किरण पसरू लागले होते . शिवबांचा जन्म झाला . संबंध शिवनेरी किल्ला सनई-चौघडा आणि नगारा यांच्या आवाजाने भारून गेला. शिवनेरीचा आनंद गगनात मावेनासा झाला.मराठी भाषण
लढाईत गुंतलेल्या की त्याचा सहवास त्यांना फारसा लाभला नाही , परंतु आई जिजाऊंचे प्रेम, शिकवण आणि गुलामगिरीत खितपत पडलेल्या राज्याची माहिती आईकडूनच शिवबाला मिळाली . लहान वयातच किल्ला किल्ला खेळत असतानाच शिवरायांनी आपल्या विचारांशी सहमत असणारे सवंगडी मिळवले. हेच पुढे शिवरायांचे खरे मैतर बनले .लढाईच्या काळात त्यांनी शिवरायांसाठी आपले प्राणही तळहातावर ठेवले.मराठी भाषण
रायरेश्वरावर स्वराज्याची प्रतिज्ञा, लगेच स्वराज्याचे तोरण, गड आला पण सिंह गेला, प्रतापगडाचा रणप्रताप, अग्र्याहून सुटका, पन्हाळ्याहून सुटका , असे एक ना एक प्रसंग अंगावर शहारे आणणारे ! महाराजांच्या शौर्याची , पराक्रमाची महती पटवून देणारे आहेत.
शिवरायांच्या पराक्रमाची कीर्ती चहू दिशेला पसरली होती. शिवरायांनी गनिमांना जेरीस आणले होते. अन्याय ,अत्याचार करणाऱ्या शत्रूंचा बंदोबस्त केला तो फक्त शिवरायांनी! शेतकऱ्यांच्या गवताच्या काडीलाही धक्का लागू नये म्हणून ते प्रयत्नशील राहिले. आपल्या सैन्यातही शिवबांचा दबदबा होता. त्यांच्या विचाराशी दुमत करणे म्हणजे वाघाच्या जबड्यात हात घालने आणि तसे धाडसही कुणी करणार नाही असा त्यांचा दरारा होता. सत्यप्रिय, लोकन्यायी हा राजा खरंच रयतेचा राजा होता. त्यांनी प्रजेच्या सुखासाठी आपले उभे आयुष्य खर्ची घातले. मनी कसलाही मोह न बाळगता केवळ जनतेसाठी जीवावर उदार होऊन शत्रूच्या मगरमिठीत हसत हसत जाऊन शत्रूची दाणादाण उडवणाऱ्या हा एकमेव राजा होता.मराठी भाषण
मित्रहो, शिवराय म्हंटले की, त्यांचा इतिहास आठवला की कशाचेही भान राहात नाही. अंगावर रोमांच उठतात आणि अन्यायाविरुद्ध मन पेटून उठतं. अशा या शिवरायांच्या इतिहासाबद्दल अनेक वाद विवाद सध्या चालू आहेत. तुम्ही - आम्ही वर्तमानपत्रांमध्ये वाचतोच आहोत. त्यांच्या दोन-दोन जयंत्या साजऱ्या केल्या जात आहेत. खरं तर रोजच शिवजन्मोत्सव साजरा केला तरी, तो त्यांना आदरांजली म्हणून कमी पडणार आहे. त्यांनी केलेल्या कार्याचे पांग फेडणे महाराष्ट्राला शक्य नाही, परंतु विचारांची, पराक्रमाची पताका आपण सदैव फडकवू शकतो.मराठी भाषण
सध्या इतिहासाबद्दल कोणी काही म्हणू काय खरं काय खोटं खरं तर हे आम्हाला नव्या पिढीला कळायलाच हवं पण मी म्हणते आजची किल्ले पाहिले तर आपण म्हणू शकतो आमच्या शिवरायांचा पराक्रम खरा आहे आमच्या शिवरायांचा हर हर महादेव वीररसाने भरलेला गजर खरा आहे त्यांनी बांधलेल्या किल्ल्याच्या प्रत्येक कार्याला दगडाला विचारा तो अजूनही साक्ष देत आहे शिवरायांच्या पराक्रमाचीमराठी भाषण शिवरायांच्या युद्धनीतीची दूरदृष्टीची शेवटी एवढंच म्हणेन मित्रांनो की ही ध्येयाच तलवार शिवाची, शत्रुंचा कर्दनकाळ, पर्वा न जीवाची। महाराष्ट्राच्या शुरवीरांनो जाणीव ठेवा , शिवबाच्या इतिहासाची।
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS