शंभर दिवस वाचन अभियान आठवडा चार या आठवड्यातील उपक्रमाविषयी थोडक्यात माहिती खालील प्रमाणे आहे
आठवडा चार या आठवड्यातील उपक्रम आहे सहभागी वाचन
साक्षरतेच्या सुरुवातीच्या टप्प्यावर सहभागी वाचन फार महत्त्वाचे असते इयत्ता पहिली आणि दुसरी साठी ही वाचन पद्धती अतिशय प्रभावी ठरते
शिक्षक मुलांना वाचून दाखवत असताना पुस्तकातील मजकूर आणि चित्रांकडे मुलांचे लक्ष वेधले जाते मुलांचा कल लिखित शब्द उच्चारलेल्या शब्दासोबत जुळवून घेण्याकडे असतो त्यामुळे मुले हळूहळू पुस्तके वाचण्याचा प्रयत्न करतात या प्रक्रियेतून शिक्षक पुस्तक डावीकडून उजवीकडे अभिव्यक्ती सह कसे वाचतात हे देखील मुले शिकतात.
या उपक्रमासाठी वाचन साहित्य किंवा गोष्टी आणि चित्रांची पुस्तके वापरावीत
2 शाळा ग्रंथालयास भेट
या उपक्रमात पहिल्या आठवड्यात ग्रंथालयातून दिलेल्या पुस्तिकेवर मुलांना व्यक्त होण्यास सांगणे
पुस्तकाचे पुस्तकांचे वाचन मुलांना चौदाव्या आठवड्यापर्यंत आवश्यक आहे त्यासाठी योग्य ते पुस्तक मिळवून द्यावे
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS