Header Ads Widget

मसावि काढणे HIGHEST COMMON FACTOR STANDARD SEVEN

HIGHEST COMMON FACTOR
मसावि  :- महत्तम सामाईक विभाजक 
इयत्ता   :- 7वी 
आजच्या या भागात मसावि म्हणजे काय ? दिलेल्या संख्यांचा मसावि कसा काढतात याचा अभ्यास करूया.
📝 मसावि म्हणजे काय ?
दिलेल्या संख्याचा मसावि म्हणजे त्या संख्यांचा सर्वात मोठा विभाजक होय उदाहरण 1 . 28 व 42 या संख्यांचा मसावि किती ?
उत्तर :- प्रथम दिलेल्या संख्याचे विभाजक लिहुया 
28 = 7,4,1,2,14,28
42 =1,7,6,14,21
28 व 42 मधील 
सामाईक विभाजक  =14
म्हणून ,
28 व 42 चा मसावि 14 आहे . 
✏️ मसावि काढण्याच्या दोन पद्धती आहेत .
       ➡️ मूळ अवयव पद्धती 
       ➡️ भागाकार पद्धती 
आज आपण मूळ अवयव पद्धतीने मसावि कसा काढतात , याची माहिती मिळवूया. 
⭕ मूळ अवयव पद्धत :- या पद्धतीने मसावि काढताना संख्या मूळ अवयव गुणाकार रुपात मांडतात . सामाईक मूळ अवयवांची यादी करतात व गुणाकार करून मसावि मिळतो
➡️ उदाहरण 1 . 28 व 42 या संख्यांचा मसावि किती ?
उत्तर :- प्रथम दिलेल्या संख्याचे विभाजक लिहुया 
28 चे मूळ अवयव =7×2×2

42 चे मूळ अवयव =7×6
                            =7×2×3
28 व 42 मधील 
सामाईक मूळ अवयव  =7×2
                              =14
म्हणून ,
28 व 42 चा मसावि 14 आहे . 
➡️  मूळ अवयव पद्धतीने 24 व 32 यांचा मसावि काढा. 
 वरील प्रत्येक संख्येत 2 हा सामाईक अवयव 3 वेळा आलेला आहे . 
म्हणून 
मसावि = 2×2×2
           = 8
उत्तर : 24 व 32 यांचा मसावि 8 आहे .




Post a Comment

0 Comments

महाराष्ट्र मंत्रीमंडळ खाते वाटप जाहीर

LEARN EXCEL PAGE SETUP - 1