🔵बोधकथा🔵
कोल्हा आणि म्हातारी
एके दिवशी एक कोल्हा संध्याकाळी पक्ष्यांची शिकार करीत शेतातून चालला असता, जवळच कोंबडी मारून वनभोजन करीत बसलेल्या काही मुली त्याला दिसल्या.
त्यांना तो म्हणाला, 'मुलींनो ह्या कोंबड्या तुम्हीच मारून खात आहात म्हणून ठीक, नाहीतर माझ्यासारख्या एखाद्या गरीब कोल्ह्याने जर ह्या कोंबड्या अशा मारून खाल्ल्या असत्या तर तुम्ही त्याच्यामागे शिकारी कुत्रे लावून त्याला पकडून त्याचा जीव घेतला असता.
हे ऐकून जवळच एक म्हातारी बसली होती ती त्याला म्हणाली, 'अरे मूर्खा, आम्ही आमच्या स्वतःच्या कोंबड्या मारून खातो नि तू लोकांच्या कोंबड्या मारून खातोस, हा फरक जर तुझ्या लक्षात आला असता, तर तू हे बोलला नसतास !'
❝ तात्पर्य ❞
स्वतःच्या वस्तूची वाटेल तशी विल्हेवाट करण्याचा अधिकार प्रत्येकास आहे, पण दुसर्याची वस्तू चोरून तिची वाटेल ती व्यवस्था करण्याचा अधिकार कोणासही नाही.
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS