देशभक्ती गीत १ . अंतरी अपुल्या
देशभक्ती गीत
१ . अंतरी अपुल्या
अंतरी अपुल्या असावी एकतेची आस
एकता निर्मू अशी जी संपवी वनवास
॥धृ॥
सर्व सुखी जन सर्वही त्राते
सर्व सारखे सर्वही भ्राते
दुःख खिन्नता भिन्नता नेइल जी विलयास॥१॥
परंपरेचा ध्वज संस्कृतिचा
केन्द्र मानुया सकल कृतीचा
पक्ष भेद वा मतमतांतरे ठरोत की आभास॥२॥
शक्तिशालिनी नव स्वतंत्रता
तशीच योजू निज कल्पकता
देश आपुला अखंड करु या लागो एकच ध्यास॥३॥
घराघरातुन राष्ट्रहितास्तव
निघोत सेवक वाढो वैभव
भावी भारत अभिमानाने स्मरेल तो इतिहास॥४॥
सामावुनिही घेइल जगता
अशी सुमंगल भारतियता
मांगल्याच्या विश्वशांतिच्या देइल संदेशास ll ५ ll
- संकलित
mantrimandal
The Education
December 21, 2024
कोणाला कोणते खाते मिळाले...... कॅबिनेट मंत्री 1.चंद्रशेखर बावनकुळे - महसूल 2.राधाकृष्ण…
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS