शारीरिक अवयवांवर आधारित वाक्प्रचार व त्यांचे अर्थ
- अंग चोरणे - फारच थोडे काम करणे
 - अंग अंगवळणी पडणे- सवय होणे
 - अंगाची लाही लाही होणे- अतिशय संताप निर्माण होणे
 - अंगात वीज संचारणे :- अचानक बळ येणे
 - ऊर भरून येणे गदगदून येणे
 - कपाळ फुटणे :- दुर्दैवी मृत्यू अचानक झालेल्या अपघातामुळे
 - कपाळाला हात लावणे :- हाताश होणे नाराजी दाखवणे
 - कंठ दाटून येणे :- गहिवरून येणे
 - कंठस्नान घालने :- शिरच्छेद करणे
 - कंटाळा येणे :- खूप कासावीस होणे
 - कंबर कसणे - जिद्दीने तयार होणे
 - कंबर खचणे - धीर सुटणे
 - काढता पाय घेणे - प्रतिकूल परिस्थिती पाहून निघून जाणे
 - कानउघडणी करणे - चुकीबद्दल शब्दात बोलणे
 - कान उपटणे- कडक शब्दात समज देणे
 
- कान टोचणे- खरमरीत शब्दात चूक लक्षात आणून देणे
 - कान निवणे- ऐकून समाधान हो
 - कान पिळणे- अद्दल घडवणे
 - कान फुंकणे- संशय निर्माण करणे
 - कानाने हलका असणे- कशावरही पटकन विश्वास ठेवणे
 - कानावर हात ठेवणे- नाकबूल करणे
 - कानावर घालने- लक्षात आणून देणे
 - कानावर येणे- सहज ऐकू येणे
 - कानीकपाळी ओरडणे- एक सारखे बजावून सांगणे
 - कानोसा घेणे - अंदाज घेणे चाहूल घेणे केसाने गळा कापणे- घात करणे
 - खांद्याला खांदा भिडवने- सहकार्याने एकजुटीने काम करणे
 - गळ्यात गळा घालने- खूप मैत्री करणे
 - गळ्यातला ताईत होणे - अत्यंत आवडता होणे
 - गळ्यापर्यंत बुडणे -डबघाईला येणे कर्जबाजारी होणे
 - गळा काढणे- मोठ्याने रडणे
 - गळा गुंतने - अडचणीत सापडणे
 - चेहरा खुलने- आनंद होणे
 - चेहरा पडणे- लाज वाटणे , खजील होणे, शरम वाटणे
 - छातीत धडधड करणे - घाबरून जाणे
 - भीती वाटणे
 - जिभेला हाड नसणे- वाटेल ते बोलणे
 - जीभ सैल सोडणे - वाटेल तसे बोलणे
 - जीव की प्राण असणे - खूप आवडणे
 - डोके घालने - लक्ष देणे
 - डोके चालवणे - बुद्धी चालवणे
 - डोके फिरणे - राग येणे
 - डोक्यावर खापर फोडणे- निर्दोष माणसावर दोष टाकणे
 - डोक्यावर घेणे- स्तुती करणे, गौरव करणे डोळ्यांचे पारणे फिटणे- समाधान होणे पाहून आनंदित होणे
 - डोळ्यात अंजन घालणे- चूक स्पष्टपणे लक्षात आणून देणे
 - डोळ्यात खूपने - मत्सर करणे सहन न होणे
 
- डोळ्यात धूळ फेकणे- हातोहात डोळ्यांदेखत खोटेनाटे सांगून फसवणे
 - डोळ्यातून थेंब न काढणे- आघात , दुःख होऊनही न रडणे
 - डोळ्यावर येणे- लक्षात येणे
 - डोळ्याला डोळा न लागणे -झोप न येणे
 - डोळा असणे - पाळत ठेवणे
 - डोळा लागणे - झोप येणे
 - डोळे उघडणे - अनुभवाने सावध होणे
 - डोळे निवणे - समाधान होणे पाहून बरे वाटणे
 - डोळे पांढरे होणे - मोठा धक्कादायक प्रसंग निर्माण होणे
 - डोळे मिटणे- मरण पावणे
 - डोळे वटारने - रागावणे
 - डोळे विस्फारणे - आश्चर्याने पाहणे
 - डोळेझाक करणे - दुर्लक्ष करणे
 - तळपायाची आग मस्तकात जाणे- अतिशय संतापणे
 - तोंड काळे करणे - कायमचे निघून जाणे
 - तोंड देणे - सामना करणे ओढवलेल्या प्रसंगातून मार्ग काढण्यासाठी सिद्ध होणे
 
  
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS