केंद्रस्तर " सखी सावित्री समिती " कार्य ?
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 125 व्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने राज्यातील सर्व शाळांमध्ये मुला मुलींच्या सुरक्षिततेसाठी व निकोप आणि समतामुलक वातावरण निर्मितीसाठी " सखी सावित्री समिती " तयार करण्यात आली आहे.
💁 केंद्रस्तर " सखी सावित्री समिती " :-
● केंद्रप्रमुख :- अध्यक्ष
● केंद्रातील महिला शिक्षक प्रतिनिधी :- सदस्य
● समुपदेशक :- सदस्य
● वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ ( महिला प्रतिनिधी ) :- सदस्य
● अंगणवाडी पर्यवेक्षिका :- सदस्य
● विधीज्ञ :- सदस्य
● बालरक्षक ( महिला प्रतिनिधी ) व केंद्रातील कोणत्याही एका शाळेतील विद्यार्थिनी प्रतिनिधी :- सदस्य
● नजीकच्या पोलीस स्टेशन मधील महिला पोलीस प्रतिनिधी :- सदस्य
● केंद्र शाळेचे मुख्याध्यापक :- सदस्य सचिव
💁 केंद्रस्तर " सखी सावित्री समिती " कार्य :-
■केंद्रस्तर समितीची दरदोन महिन्यातून एक (आवश्यकता भासल्यास अधिक वेळा) बैठका केंद्रशाळेत आयोजित कराव्यात.
■ आपल्या कार्यक्षेत्रातील मुला-मुलींची १००% पटनोंदणी, १०० टक्के उपस्थिती, तसेच शाळाबाह्य व स्थलांतरीत पालकांच्या मुला-मुलींचे १०० टक्के समायोजनासाठी शाळास्तर समितीला मार्गदर्शन करणे व कार्यवाहीसाठी पाठपुरावा करणे.
■ मुला-मुलींना करिअर मार्गदर्शन, कौशल्य विकसन, मुलींसाठी स्व-संरक्षणाचे प्रशिक्षण व कार्यक्षेत्रातील बालविवाह बंद करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यासाठी शाळास्तर समितीला मार्गदर्शन करणे, व यासंबंधीचा अहवाल तालुकास्तर समितीकडे सादर करुन योग्य कार्यवाहीसाठी प्रयत्न करणे तसेच लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा ( POCSO) अंतर्गत असलेल्या "ई-बॉक्स" व "CHIRAG" या अॅपबाबत जागृती करणे.
■शाळास्तरावर राबविण्यात येणाऱ्या सर्व उपयोजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यासाठी शाळास्तर समितीवर नियंत्रण ठेवणे. केंद्रातील कोणत्याही शाळेने या उपयोजनाची अंमलबजावणी योग्यरित्या केल्यास त्यांच्या प्रयत्नांना प्रसिद्धी व प्रोत्साहन देणे.
■ केंद्रस्तर समितीने कार्याचा अहवाल तालुकास्तर समितीच्या प्रत्येक ३ महिन्याच्या बैठकीत सादर करावा, जेणेकरून केंद्रातील कोणत्याही स्तरावर निर्माण झालेल्या समस्यांचे समाधान करण्यासाठी तालुकास्तर समितीला तातडीने निर्णय घेणे शक्य होईल.
■ शाळास्तर समिती व तालुकास्तर समिती यांच्यामध्ये समन्वयाचे कामकाज करणे.
■ सदर समितीचा फलक कार्यालयाच्या दर्शनी भागावर लावावेत.
शिक्षक व विद्यार्थी यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त अँप DOWNLOAD APP NOW 👇 https://bit.ly/3kSua93
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
👉🏻 LIKE
👉🏻 Share
👉🏻 Subscribe
👉🏻 Follow
हे पाहिले❓❓ 👇
👉🏻 एक्सेल 35 व्हिडिओ* https://bit.ly/3jTR2n8
👉🏻 एम एस वर्ड व्हिडिओ
https://bit.ly/3kLGTu9
🎯🎯🎯🎯🎯🎯
www.estudi.in
या वेबसाईटला भेट द्या
❇️❇️❇️❇️❇️❇️
विविध माहितीपुर्ण व्हिडिओ साठी खलील लिंक वरून चॅनेल *SUBSCRIBE* करा https://bit.ly/3nAXgJM
🔅🔅🔅🔅🔅🔅🔅
लक्ष्मण ननवरे
प्राथमिक शिक्षक
तलासरी , पालघर
संपर्क 8446699081
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS