Header Ads Widget

ShalapurvaTayariAbhiyan2022 शाळा पूर्व तयारी अभियान दुसरा मेळावा आयोजीत करणे बाबत , मा .संचालक यांचे पत्र निर्गमित

ShalapurvaTayariAbhiyan2022
शाळापूर्व तयारी अभियान दुसरा मेळावा आयोजीत करणे बाबत , मा .संचालक यांचे पत्र 


वरील विषयानुसार इयत्ता पहिलीला दाखल बालकांसाठी "शाळापूर्व तयारी अभियान"राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतंर्गत मेळावा 1 चे आयोजन एप्रिल 2022 मध्ये करण्यात आले होते. या मेळाव्यानंतर पहिले पाऊल पुस्तिका, कृती पत्रिका व आयडिया कार्ड या साहित्याच्या आधारे बालकाची शाळा पूर्व तयारी सुरू आहे . या प्रमाणे 8 ते 10 आठवडे बालकांची शाळापूर्व तयारी करून घेतल्यानंतर उपक्रमाच्या पुढील टप्प्यात शाळा स्तरावर शाळापूर्व तयारी अभियान मेळावा दुसरा  चे आयोजन करावयाचे आहे .  शाळा सुरू झाल्यानंतर विदर्भातील जिल्ह्यामध्ये 29जून 2022 व इतर सर्व जिल्ह्यात 15 जून 2022 रोजी शाळा पूर्व तयारी मेळावा दुसरा चे आयोजन एकाच दिवसी करावयाचे आहे .
शाळा स्तरावर मेळावा आयोजन करण्याबाबत महत्त्वाच्या सूचना -
1) जिल्ह्यातील सर्व जिप, नपा व मनपा च्या सर्व शाळांमध्ये मेळाव्याचे आयोजन व नियोजन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी जिल्हा शिक्षण विभाग , मनपा व नपा प्रशासन अधिकारी व ICDS विभाग यांच्या समन्वयातून करावे.मेळावा आयोजित  करण्याबाबत नियोजन शाळांना पर्यवेक्षणीय यंत्रने मार्फत कळविण्यात यावे.
2) मेळाव्याचे आयोजन दैनंदिन शालेय वेळेत करण्यात यावे. मेळाव्याचा कालावधी साधारण 4 तासांचा असावा.
3) शालेय वातावरण प्रसन्न व आरोग्यदायी असावे , यासाठी शालेय परिसर स्वच्छता करण्यात यावी.
4) शाळापूर्व तयारी मेळाव्यात इयत्ता पहिलीत  प्रवेशित सर्व बालकांचे पालक सहभागी व्हावेत , यासाठी मेळाव्याचे आयोजनापूर्वी एक किंवा दोन दिवस अगोदर वस्तीवर , पाड्यावर , गावात प्रभातफेरी काढण्यात यावी.दवंडी व समाज माध्यमातून जनजागृती करण्यात यावी.पोस्टरर्स लावण्यात यावेत .यामध्यमातून सर्व बालकांना व पालकांना मेळाव्यात सहभागी करून घ्यावे.
5) उपक्रमाच्या अनुषंगाने झालेल्या प्रशिक्षण मधील सूचनाप्रमाणे मेळाव्यात 7 स्टॉल लावले जावेत. सर्व स्टॉल वर बालकांच्या कृतीच्या नोंदी विकास पत्रावर मेळावा क्रमांक दोन या रकान्यात कराव्यात
6) मेळाव्याबाबत बैठकांचे आयोजन करण्यात यावे .
7) गटशिक्षणाधिकारी व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख  यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात यावे.
8)  केंद्रप्रमुखांनी केंद्रात सर्व मुख्याध्यापक यांची बैठक घेऊन मेळाव्याचे नियोजन व आयोजन करावे.मुख्याध्यापक यांनी शाळातर सभा घ्यावी .
9) मेळाव्याबाबतीत फोटो , व्हिडीओ समाज माध्यमातून प्रसिद्ध करण्यात यावेत . यासाठी #ShalapurvaTayariAbhiyan2022
#शाळापूर्वतयारीअभियान2022
#ShalapurvaTayari2022 या 
हॅशटॅगचा (#) उपयोग करावा. तसेच 
http://www.facebook.com/Mahascert  या पेजला टॅग करण्यात यावे . 
10)  वरील मेळाव्याची माहिती बाल शिक्षण विभागास आठ दिवसांत सादर करण्यात यावी.
11)  शाळा स्तरावर मेळाव्याचे आयोजन व्यवस्थित व्हावे यासाठी पर्यवेक्षणीय अधिकारी यांनी भेटी द्याव्यात व सनियंत्रण करावे .
12) इतर सुचनासाठी परिपत्रक वाचावे व त्याची अंमलबजावणी करावी 

परिपत्रक download  करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक click करा.



शाळा पूर्व तयारी अभियान पहिले व्हिडिओ पहा व पुढे पाठवा .








Post a Comment

0 Comments

व्हिडीओ निर्मिती स्पर्धा 2023 निकाल लिंक

LEARN EXCEL PAGE SETUP - 1