सर्व विद्यार्थी आणि पालकांसाठी अत्यंत महत्वाची माहिती असून सन 2023 च्या होणाऱ्या बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक मंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे.तरी इ.10 वी व इ.12 वी बोर्ड परीक्षेच्या तारीख पुढीलप्रमाणे देण्यात आले असून मंडळाच्या वेबसाईटवर देखील लवकरच उपलब्ध करून देण्यात येत आहे.
फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) लेखी परीक्षांची संभाव्य वेळापत्रके मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दि. १९/०९/२०२२ पासून उपलब्ध करून देण्यात आलेली असून, सदर वेळापत्रकांबाबत सूचना असल्यास मंडळाकडे १५ दिवसांच्या आत लेखी स्वरूपात मागविण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार संघटना, पालक, शिक्षक यांचेकडून प्राप्त झालेल्या सूचनांचे अवलोकन करून इ.१२वी व इ.१०वी ची वेळापत्रके अंतिम करण्यात आलेली आहेत. अंतिम वेळापत्रकानुसार लेखी परीक्षा खालील कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (सर्वसाधारण व द्विलक्षी विषय) व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम - मंगळवार, दि. 21 फेब्रुवारी, 2023 ते मंगळवार दि. 21 मार्च 2023
■ माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा - गुरुवार, दि. 02 मार्च 2023 ते शनिवार, दि. 25 मार्च 2023
उपरोक्त कालावधीमध्ये आयोजित केलेले दिनांकनिहाय सविस्तर अंतिम वेळापत्रके मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर दि. ३०-१२-२०२२ पासून उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा / उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालय यांचेकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ठ व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्सअॅप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये. प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांच्या परीक्षांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा/ कनिष्ठ महाविद्यालय यांना कळविण्यात येईल
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS