Header Ads Widget

इयत्ता दुसरी ते पाचवीसाठी निपुण भारत: अध्ययन अभ्यास सर्वेक्षण होणार / उद्बोधन सत्राचे आयोजन / इयत्ता दुसरी ते पाचवीला शिकविणाऱ्या शिक्षक यांचे उद्बोधन #nipunbharat mission

प्रति,
१) प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व),
२) शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई,
३)शिक्षणाधिकारी, प्राथमिक / जि.प. (सर्व),
४)शिक्षण निरीक्षक (पश्चिम, दक्षिण, उत्तर), मुंबई,
५)प्रशासनाधिकारी, मनपा/नपा, (सर्व).

विषय:  इयत्ता दुसरी ते पाचवीसाठी निपुण भारत: अध्ययन अभ्यास सर्वेक्षणाच्या                                आयोजनासाठी   यु-ट्युब लाईव्ह उद्बोधन सत्राबाबत....
                         

 वरील विषयान्वये इयत्ता दुसरी ते पाचवीमधील विद्यार्थ्यांचे निपुण भारत: अध्ययन अभ्यास सर्वेक्षण करण्यात येणार   आहे,  सदर सर्वेक्षण कसे करावे, सर्वेक्षण साधन (Tool) रचना, मूल्यांकन  रुब्रिक रचना, श्रेणींची नोंद विद्यार्थी कृती-कार्यक्रम  यादृष्टीने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे मार्फत शिक्षकांसाठी *दिनांक २० डिसेंबर २०२२* रोजी दुपारी ठीक १२:०० वाजता ते ०१:०० या कालावधीत यु-ट्युब लाईव्ह उद्बोधन सत्राचे आयोजन करण्यात येत आहे.  

या सत्रासाठी  इयत्ता दुसरी ते पाचवीला अध्यापन करणाऱ्या सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शिक्षक व मुख्याध्यापक यांनी  खालील  यु-ट्युब लिंकवर  ऑनलाईन उपस्थित राहण्यास सूचित करावे. 

काही शिक्षकांना काही कारणास्तव या सत्रास उपस्थित राहणे शक्य न झाल्यास खालील यू ट्यूब लिंकवर ते आपल्या सोयीनुसार सत्र पाहू शकतात. 

तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील सर्व अधिकारी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक /माध्यमिक), शिक्षण  विस्ताराधिकारी (सर्व), केंद्रप्रमुख (सर्व),  BRC विषय साधन व्यक्ती व विशेष साधन व्यक्ती यांनी सुद्धा उपस्थित रहावे. 

यु-ट्युब लिंक


 
( राजेश पाटील ) भा.प्र.से
संचालक,
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.

Post a Comment

0 Comments

महाराष्ट्र मंत्रीमंडळ खाते वाटप जाहीर

LEARN EXCEL PAGE SETUP - 1