Header Ads Widget

UDISE+ शाळेत उपलब्ध असलेल्या सोयी-सुविधांची माहिती

Unified District Information System for Education Plus (UDISE+) युडायस प्लस २०२२-२३ ऑनलाईन माहिती

Unified District Information System for Education Plus (UDISE+) युडायस प्लस २०२२-२३ ऑनलाईन माहिती 
भारत सरकार शिक्षा मंत्रालयाकडून समग्र शिक्षा योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने उपरोक्त संदर्भिय पत्रानुसार Unified District Information System for Education Plus (UDISE+)  युडायस प्लस २०२२-२३ प्रणालीची सर्व माहिती अचूक भरण्याच्या सूचना या कार्यालयाकडून देण्यात आल्या आहेत. त्या सूचना काय आहेत. कोणती माहिती तपासली जाणार आहे. कोणामार्फत ही माहिती तपासली जाणार. शाळांनी काय करावे याविषयी आलेले पत्रक याविषयी माहिती दिलेली आहे
: विषय: - युडायस प्लस २०२२-२३ ऑनलाईन माहिती भरणेबाबत.. 

संदर्भ :- १. Department of School Education and Literacy Ministry of Education. Government of India, New Delhi यांचे पत्र क्र.D.O.No. २३-४/२०२२- Stats, दि. ८/१२/२०२२
२. या कार्यालयाचे प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व) यांना पाठविलेले पत्र जा.क्र.मप्राशिप/राशि/ यु-डायस / संगणक/२०२२-२३/३७९६, दि.३०/१२/२०२२

3. Department of School Education and Literacy, Statistics Division, Government of India, New Delhi यांचे पत्र क्र.F.No.२३-४/२०२२-Stat दि.३/०२/२०२३

४. या कार्यालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.सर्व यांना पाठविलेले पत्र जा.क्र.मप्राशिप/ समग्र शिक्षा / संगणक / U-DISE / २०२२-२३/३५८ दि.०३/०२/२०२३

५. या कार्यालयाचे शिक्षणाधिकारी (प्राथ. व माध्य.) जि.प.सर्व व प्रशासनअधिकारी, महानगरपालिका, सर्व यांना पाठविलेले पत्र जा. क्र. मप्राशिप / समग्र शिक्षा/ संगणक / २०२२-२३/५८१, दि.२१/०२/२०२३

 भारत सरकार शिक्षा मंत्रालयाकडून समग्र शिक्षा योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने उपरोक्त संदर्भिय पत्रानुसार युडायस प्लस २०२२-२३ प्रणालीची सर्व माहिती अचूक भरण्याच्या सूचना या कार्यालयाकडून देण्यात आल्या आहेत. तसेच वेळोवेळी Zoom Meeting घेऊन सर्व गटशिक्षणाधिकारी, जिल्हास्तर Programmer, तालुका स्तर MIS- Coordinator, Data Entry Operator यांना युडायस प्लस २०२२-२३ प्रणालीमध्ये माहिती भरण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. तसेच Whats app ग्रुपवर दररोज Progressive Report मेसेजेस व्दारा पाठविला जातो, तरी देखील अद्याप राज्यातील ९३४१ शाळांचे Student Entry काम शून्य आहे. तसेच राज्याचे Student Entry काम अद्यापही ३५ % अपूर्ण आहे. साधारण ७८ लाख विद्यार्थ्यांची माहिती अद्याप भरलेली नाही. शिवाय शाळांनी भरलेल्या विद्यार्थ्याच्या माहितीमध्ये अनेक चुका आढळून आल्या आहेत.



युडायस २०२२-२३ प्रणाली माहितीचे विश्लेषण केले असता शाळा, शिक्षक यांच्या संदर्भातही त्रुटी आढळून आल्या आहेत. यामुळे राज्याच्या बजेटवर परिणाम होण्याची शक्यता आहे. तरी गटशिक्षणाधिकारी यांनी युडायस प्रणालीवरील सर्व माहिती अचूक भरण्यासाठी आपल्या स्तरावरून मुख्याध्यापकांना लेखी सूचना देण्यात द्याव्यात. विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख व समग्र शिक्षा कर्मचारी यांचेकडून युडायस प्लस २०२२-२३ फॉर्म तपासणी काटेकोरपणे करून फॉर्ममधील सर्व माहिती अचूक असल्याची खात्री आपण करून घ्यावी. मुख्याध्यापकांकडून त्रुटी राहील्या असल्यास त्यांच्याकडूनच त्वरीत दुरुस्त्या करून घ्याव्यात. युडायस फॉर्म तपासणी करताना खालील महत्त्वाच्या मुद्यांची मदत घ्यावी.
 ब) शाळेत उपलब्ध असलेल्या सोयी-सुविधांची माहिती तपासताना खालील बाबी अचूक असल्याची खात्री करावी.

१. पिण्याच्या पाण्याची सुविधा व स्रोत

२. सर्व मुले व मुलींसाठी उपलब्ध असलेले स्वच्छतागृह

३. CWSN मुले व मुलींसाठी उपलब्ध असलेले स्वच्छतागृह (कमोड खुर्चीसुध्दा चालेल)

४. किचन गार्डन

५. कम्पाऊंड वॉल

६. खेळाचे मैदान

७. रॅम्प

८. विद्युत सुविधा

९. किचन शेड

१० कम्पाऊंड वॉल दुरुस्ती

११. स्वच्छतागृह दुरुस्ती


१२. शाळा इमारत दुरुस्ती

Post a Comment

0 Comments

महाराष्ट्र मंत्रीमंडळ खाते वाटप जाहीर

LEARN EXCEL PAGE SETUP - 1